SBI Clerk 2020: मेन्स परीक्षा स्थगित
SBI Clerk 2020 Main Postponed
SBI Main Exam Postponed : Due to the Corona Virus Effect SBI Decided to Postponed Clerk 2020 Main Exam. SBI ने एक परिपत्रक जारी केलं आहे. यात मुख्य परीक्षा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पूर्व परीक्षेच्या निकालाबाबतही माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क भर्ती प्रक्रियेतील पूर्व परीक्षेचं आयोजन २२,२९ फेब्रुवारी आणि १, ८ मार्च २०२० रोजी करण्यात आलं होतं. याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवार या निकालाची वाट पाहत आहेत.
करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे भारतीय स्टेट बँकेतील क्लर्क पदाच्या भरतीसाठी होणारी मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजी मुख्य परीक्षा होणार होती, जी स्थगित झाली आहे. ही भरती ८ हजार पदांसाठी होणार होती.
एसबीआयच्या परिपत्रकात लिहिलं होतं की ‘नोवेल करोना व्हायरसमुळे बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन SBI clerk / Junior Associates ची ऑनलाइन मुख्य परीक्षा स्थगित करण्यात येत आहे. ही परीक्षा १९ एप्रिल २०२० रोजी होणार होती. या परीक्षेची नवी तारीख आणि पूर्व परीक्षेचा निकाल कधी घोषित होईल याची तारीख वेबसाइटवर घोषित केली जाईल.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
असं म्हटलं जातंय की परीक्षेची नवी तारीख लॉकडाऊनंतरच जाहीर होईल. अॅडमिट कार्डही १५ एप्रिलनंतरच मिळते. यासंबंधातील सर्व माहिती उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर मिळेल.
सौर्स : महाराष्ट्र टाइम्स