साताऱ्यात होणार MIDC चे प्रादेशिक कार्यालय, अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार! – Satara MIDC Bharti 2024
Satara MIDC Bharti 2024
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजात वाढत्या औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रममाणात वाढ झाली आहे. बहुतांशी जिल्ह्यात दोन ते तीन जिल्ह्यांसाठी एमआयडीसीचे एकच कार्यालय असल्याने उद्योजकांची अडचण होत आहे. याची दखल घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेऊन सात जिल्ह्यांत प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. यासाठी ९२ पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे (Satara MIDC Bharti 2024). एमआयडीसीची दोन ते तीन जिल्ह्यांसाठी एकच कार्यालय असल्याने उद्योजकांच्या विविध कामांसाठी त्यांना कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. साताऱ्यात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी यापूर्वीच्या उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननेही पाठपुरावा ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाची सात प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सातारा, सोलापूर, बारामती, नगर, जळगाव, अकोला व चंद्रपूरचा समावेश आहे. या कार्यालयांचा आकृतिबंध दहा महिन्यांच्या आत वित्त विभागाकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, तसेच या कार्यालयांसाठी ९२ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचा खर्चही औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून भागविण्याची सूचना केली आहे विविध पदांमध्ये प्रादेशिक अधिकारी सात, व्यवस्थापक पाच क्षेत्र व्यवस्थापक एक, उपरचनाकर सात, प्रमुख भूमापक सात, सहायक क्षेत्र व्यवस्थापक १४, सहायक १७, लिपिक टंकलेखक १७, वाहनचालक सात, शिपाई १० पदांचा समावेश आहे. साताऱ्यात प्रादेशिक कार्यालय करण्याचा निर्णय झाल्याने येथील उद्योजकांची अनेक दिवसांपासूनच मागणी पूर्ण झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.