Sassoon Sarvopchar Hospital Pune Bharti 2025
ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेत सातत्याने अडथळे येत असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची दि. ३० ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये तब्बल ३० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यात एक दिवस (दि.३१) वाढवला होता. त्यामुळे अर्जाची संख्या वाढणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या पदभरतीमध्ये कक्षसेवक १६८, आया ३८, सेवक ३६, पहारेकरी २३, शिपाई २, क्ष-किरण सेवक १५, हमाल १३, रुग्ण पटवाहक १०, सहायक स्वयंपाकी ९, नाभिक ८, स्वयंपाकी सेवक ८, प्रयोगशाळा सेवक ८, बटलर ४, दवाखाना सेवक ४, माळी ३, प्रयोगशाळा परिचर १, भांडार सेवक १ आणि गॅस प्रकल्प चालक १ अशी पदे आहेत. आयबीपीएस कंपनीमार्फत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. या पदांसाठी वेतनश्रेणी १५ हजारांपासून ४७हजार ६०० रुपयांपर्यंत आहे.
ससून रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आता सरळसेवा भरतीला सुरुवात झाली असून, या भरतीनंतर रुग्णालयात रुग्णसेवेतील अनेक तक्रारी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अंतर्गत ससून रुग्णालयात चतुर्थश्रेणी पदाच्या (गट ड, वर्ग ४) १९ संवर्गातील ३५४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. या जागांसाठी २६ ऑगस्टपर्यंत तब्बल १९ हजार जणांनी अर्ज केले आहेत. या पदांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे अर्जांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयात अनेक वर्षांनंतर कायमस्वरूपी सरळसेवेने शासकीय नोकरभरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यासाठी वेतनश्रेणी १५ हजार ते ४७ हजार ६०० आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे भरतीच्या प्रकियेत असलेल्या, शासकीय नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये १९ संवर्ग असून त्यापैकी सर्वाधिक १६८ जागा या कक्षसेवक पदासाठी आहेत.
त्या पाठोपाठ आया ३८, चतुर्थश्रेणी सेवकासाठी ३६, पहारेकरी २३, क्ष किरण सेवकाच्या १५, हमालाच्या १३, रुग्णपटवाहक १० असे विविध पदे असलेले वेगवेगळे संवर्ग आहेत, तर प्रयोगशाळा, नाभिक व स्वयंपाकी यासाठी प्रत्येकी ८ जागा आहेत. उर्वरित शिपाई, माळी, बटलर, दवाखाना सेवक, प्रयोगशाळा परिचर, संदेशवाहक, गॅस प्लँट ऑपरेटर, भांडारसेवक आदींसाठी १ ते ४ च्या दरम्यान जागा आहेत. प्रत्येक संवर्गासाठी सामाजिक आरक्षणही लागू आहे. ससून रुग्णालयातील चतुर्थश्रेणी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी आतापर्यंत १९ हजार अर्ज आले असून, इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याची परीक्षा ‘आयबीपीएस’ घेणार आहे.
अर्ज करण्याबाबत तपशील
- अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : https://bjgmcpune.com
- अर्ज सादर करण्याचा व ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२५, २३ : ५९ वाजेपर्यंत
- परीक्षेची तारीख व कालावधी : https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
- वेतनश्रेणी : १५ हजार ते ४७ हजार ६०० आहे
- पदे : १९ संवर्गातील ३५४ पदे
- खुल्या प्रवर्गासाठी शुल्क : १ हजार
- राखीव प्रवर्गासाठी शुल्क : ९००
- प्राप्त अर्ज : १९ हजार (२६ ऑगस्टअखेर)
या सर्व उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार असून, ही परीक्षा बँकांसाठी विविध भरती परीक्षा घेणारी स्वायत्त संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन’ (आयबीपीएस) ही संस्था घेणार आहे. स्वायत्त संस्थेला परीक्षेची जबाबदारी दिल्याने त्यामध्ये परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाण्याची अपेक्षा आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे, तर मौखिक परीक्षा लागू नाही.
पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक
ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसात सुरू केली जाणार आहे. कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यावर राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत ससून रुग्णालयाच्या समस्यांचा पाढाच वाचला. यावर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व परिसरातील हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया साधनसामग्री आणि औषधांचा तुटवडा वारंवार जाणवत आहे. अत्यावश्यक सेवा, विशेषतः आपत्कालीन विभाग व सर्जरी विभाग, योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापन अत्यंत असमाधानकारक आहे. वॉर्ड व ओपीडी विभागात स्वच्छतेचा अभाव असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, ससून बाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न वस्तुस्थिती आहे. ससून रुग्णालयास २३५० पदे मंजूर असून त्यातील ७८९ पदे रिक्त आहेत. परिचारकांची १६० पदे रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे. चतुर्थश्रेणी कामगार पदे टीसीएस च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय भरते. याबाबतही सूचना केल्या होत्या. मात्र ही भरती झालेली नाही. मात्र, पुढील आठ दिवसात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मिसाळ यांनी दिले. तसेच स्वच्छतेच्या कामाची तपासणी करून चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Sassoon Sarvopchar Hospital Pune Bharti: Sassoon Sarvopchar Hospital Pune is going to recruit interested and eligible candidates for the “Professor, Associate Professor” posts. The total number of posts is 18. The employment place for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply through Online mode. The last date to send the application is the 14th of October 2023. More details are as follows:-
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- पदसंख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – ६९ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/
Sassoon Sarvopchar Hospital Pune Vacancy
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | 08 |
| सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | 07 |
| प्राध्यापक (चिकित्सालयीन) | 01 |
| सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) | 02 |
Educational Qualification For Sassoon Sarvopchar Hospital Pune Recruitment
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| प्राध्यापक (अतिविशेषोपचार) |
|
| सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) |
|
| प्राध्यापक (चिकित्सालयीन) |
|
| सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) |
|
Salary Details For Sassoon Sarvopchar Hospital Pune Notification
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | रु.२,३०,०००/- |
| सहयोगी प्राध्यापक (अतिविशेषोपचार) | रु.२,१०,०००/- |
| प्राध्यापक (चिकित्सालयीन) | रु.१,८५,०००/- |
| सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) | रु.१,७०,०००/- |
How To Apply For Sassoon Sarvopchar Hospital Pune Application
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Sassoon Sarvopchar Hospital Pune Jobs
- भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.(मुलाखतीचे वेळापत्रक वेगळ्याने कळविण्यात येईल.)
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी Online सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मुळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक राहील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.med-edu.in Bharti | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/ftMST |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/hqtzF |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.med-edu.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















