Sangli Urban Bank Hall Ticket, Call Latter 2026 Download Print Online – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. आता भरतीत पात्र उमेदवारांच्या यादीनुसारच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्या उमेदवारांना लवकरच सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याची सूचना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हा बँकेने मार्च २०२६ मध्ये नोकरभरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, पात्रता यादीतील काही उमेदवारांवर अन्याय झाल्याची तक्रार विभागीय सहनिबंधकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार व पणन विभागाने ३० मार्च २०२६ रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या महाभरतीच्या या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त सराव पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहे.
दरम्यान, ही स्थगिती उठविण्यात आल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थगिती उठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्थगिती उठल्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रे बॅंकेकडे जमा करण्याची सूचना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे.
सांगली DCC बँक भरती संदर्भात एक महत्वाचा नवीन अँड आम्ही समोर घेऊन घेऊन आलो आहे (Sangli DCC Bank Call Letter Download). जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ लिपिक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत, म्हणजेच १० जुलै २०२६ पर्यंत तब्बल १९ हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले नव्हते. आता अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेच्या तारखेची घोषणा कधी होणार याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या लिपिक भरतीची संपूर्ण प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. बँकेने २४ जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. या भरतीत एकूण ४४४ पदांपैकी ७० टक्के जागा सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी, तर उर्वरित ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता या भरती साठी लेखी परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आणि अन्य महत्वाची माहिती बघूया.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतीक्षित नोकर भरतीला उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कनिष्ठ लिपिकाच्या ४४४ पदांसाठी तब्बल १८ हजार ९२४ अर्ज दाखल झाले (Sangli District Central Cooperative Bank IBPS Exam Date) आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेच्या तारखेकडे लागले आहे. जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांची भरती प्रक्रिया ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी २४ जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत होते. एकूण पदांपैकी ७० टक्के जागा सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी, तर उर्वरित ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एका जागेसाठी ४२ वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी शासनाकडे आक्षेप नोंदवत भरतीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती; मात्र जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठविली. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बँकेने अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविली होती. अखेर शुक्रवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. भरतीच्या पुढील टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून, या परीक्षेला ९० गुण, तर मुलाखतीला १० गुण असणार आहेत. मुलाखतीतील पाच गुण शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि पाच गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. लेखी परीक्षेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड येथे परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता हजारो उमेदवारांना परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा लागली आहे.
तर मित्रांनो, सांगली DCC बँक भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यात IBPS कडून सर्व अर्जांची सविस्तर छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींची पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून प्रवेशपत्र (Sangli DCC Bank Admit Card, Hall Ticket Download Link) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भरतीसाठीची लेखी परीक्षा सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड या सहा जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतील उमेदवारांना परीक्षेसाठी या केंद्रांवर जावे लागणार आहे.

भरती प्रक्रिया सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेतील काही बाबींवर आक्षेप घेत शासनाकडे ती स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने काही काळासाठी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय दिल्यानंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. अर्ज दाखल करण्याची मूळ अंतिम मुदत ८ जुलै होती. मात्र, स्थगितीमुळे काही उमेदवारांना अर्ज करता न आल्याने बँकेने दोन दिवसांची मुदतवाढ देत अंतिम तारीख १० जुलै निश्चित केली. या मुदतवाढीचा लाभ घेत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्जांची संख्या तब्बल १९ हजारांवर पोहोचली असून, प्रत्येक एका जागेसाठी सरासरी ४३ हून अधिक उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















