संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती लवकरच सुरु होणार! – SAMBHAJI NAGAR SHIKSHAK BHARTI
SAMBHAJI NAGAR SHIKSHAK BHARTI
SAMBHAJI NAGAR SHIKSHAK BHARTI – The education department decided to recruit another 20,000 teachers. For this, each organization completed the process of updating the point list. Senior teachers, who were previously adjusted in the zilla parishad and education department, are being brought back to normal through adjustment. After the completion of this phase, the recruitment will be started by the Zilla Parishad by advertising. Recruitment will be started by advertising. Once the ad comes out, eligible students will be given a choice. Further processing will follow. The process of filling up the posts of 13,500 teachers in the state has been going on for the last few days and so far many teachers have been given appointment letters. Accordingly, the government has decided to recruit teachers as there are a large number of vacancies in local bodies, private aided and aid-eligible schools, even though teachers are being admitted in various schools.
जिल्हा परिषदेच्या दोन हजार १२० शाळांमध्ये बिंदुनामावलीनुसार शिक्षकांची ८१६ पदे रिक्त आहेत. पण, ३० टक्के पदे रिक्त ठेवली जाणार असल्याने आणि आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात आलेल्या शिक्षकांमुळे नवीन शिक्षक भरतीतून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला केवळ ५७१ शिक्षक मिळणार आहेत. या संदर्भात १५ जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एक वर्षापूर्वी जाहीर झालेली जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेली नाही. भावी शिक्षकांनी ‘पवित्र’वर नोंदणी करून आता चार महिने होत असून ‘टेट’ परीक्षेलाही सहा महिने होऊन गेले. तरीदेखील नोंदणीशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घेतली. त्यानंतर काही जात संवर्गासाठी जागा कमी किंवा त्या संवर्गातील पदेच रिक्त नसल्याचा आक्षेप नागपूरच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्केच पदभरतीचा निर्णय झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आचारसंहितेपूर्वी नियोजन
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रिया २९ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.
आचारसंहितेपूर्वी नियोजन अशी राहील भरती प्रक्रिया
१० टक्के पदे बिंदुनामावलीवरील आक्षेपांची पूर्तता झाल्यावर भरायची आहेत. आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून २०० शिक्षक आले आहेत. संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील ९९ शिक्षक परजिल्ह्यात गेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून जि. प.ला १०१ शिक्षक मिळाले आहेत. त्यांना काही दिवसांत नेमणूक दिली जाईल. एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीतील १०१ आणि ८१६ रिक्त पदांमधील ७० टक्के (५७१) पदे आता भरली जाणार आहे. गणित, विज्ञान व इंग्रजी विषय शिक्षकांना प्राधान्य मिळेल.
शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या ९६४ जागा भरण्यात येणार आहेत. गुरुवारपासून (ता. २८) शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू केली जाणार आहे. जाहिरात देऊन भरती सुरू केली जाणार आहे. जाहिरात निघाली, की पात्र विद्यार्थ्यांना चॉइस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अनुदानास पात्र शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तरीही राहणार रिक्त पदे…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ८४७ तर उर्दू माध्यमात ११७ अशा एकूण ९६४ जागा विविध प्रवर्गाच्या भरण्यात येणार आहेत. परंतु, शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची काही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहेत.
बिंदूनामावली नुसार जिल्ह्यातील रिक्त पदे
((मराठी माध्यम)))
अनुसूचित जाती ; २२२
अनुसूचित जमाती ; १४८
भटक्या जमाती ब ; ७
विमुक्त जमाती अ ; १
इतर मागासवर्गीय ; २९०
विशेष मागासवर्गीय ; ८
एकूण ; ८४७
((उर्दू माध्यम))
अनुसूचित जाती ; २४
विमुक्त जाती अ ; ७
भटक्या जमाती ब ; ७
भटक्या जमाती क ; १५
भटक्या जमाती ड ; ८
इतर मागासवर्गीय ; ४७
विशेष मागासवर्गीय
एकूण ; ११७
Comments are closed.