‘सैनिकी सेवापूर्व’ची प्रवेशप्रक्रिया जाहीर
Sainik Service Preparatory Institute Aurangabad Admission Schedule Declared
Sainik Service Preparatory Institute Aurangabad Admission Schedule Declared : औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (सर्व्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिट्यूट) येथील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाइटवर उपलब्ध असून, येत्या २७ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे.
सध्या दहावीत शिकत असणारे विद्यार्थी ज्यांची जन्मतारीख २ जानेवारी २००४ ते १ जानेवारी २००७ या कालावधीतील आहे; तसेच जून २०२१ मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी पात्र असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र समजले जाणार आहेत. प्रवेशासाठी लेखी परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर,औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि लातूर या आठ केंद्रांवर एकाच दिवशी रविवार १४ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. पुणे केंद्रावर पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना परीक्षा देता येणार आहे.
संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची एसपीआयची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण भारतीय सशस्त्र दलांमध्ये अधिकारी बनले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : म. टा.