सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा स्थगित

Sainik Schools Admission

National Indian Military College Admission Entrance Test Postponed

Sainik Schools Admission  : The entrance exam for the military college has been postponed. Students can now apply for this exam till June 10. The exam was scheduled for June 5. Further details are as follows:-

सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा स्थगित. मिलीटरी कॉलेजची प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पाच जूनला होणार होती. इयत्ता सातवीत शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घेता येतो. त्यासाठी यंदा पात्रता प्रवेश परीक्षा पाच जून रोजी होणार होती. परीक्षेसाठी २१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार होते. आता मात्र हा कालावधी वाढवून १० जूनपर्यंत करण्यात आला आहे.


सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर

Sainik Schools Admission – Military college entrance exam has been postponed. Applications can be filled till May 21 as per the revised schedule given by Maharashtra State Examination Council.

सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर. सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 21 मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

लॉकडाउनचा विचार करत परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत बदल करण्यात आलेला आहे. डेहराडून येथील या महाविद्यालयासाठी प्रवेशप्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे.

डेहराडून येथील लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षा पाच जूनला होणार होती. पण ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. आधी १५ एप्रिलपर्यंत अर्ज स्विकृतीची प्रक्रिया होणार होती, परंतु देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थी, पालकांना अर्ज भरण्यास येणाऱया अडचणी लक्षात घेत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.


सैनिकी शाळांत मिळणार मुलींना प्रवेश

Sainik Schools Admission : लष्करी दलांना प्रमुखांसह सर्वोत्तम उच्चाधिकारी देणाऱ्या शासकीय सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यास मागील वर्षीच सुरुवात झाली. पण त्यामध्ये पहिल्या टप्प्यात फक्त सात शाळांचा समावेश होता. आगामी शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्व म्हणजे ३३ सैनिकी शाळांत मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. याचा ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’ अर्थात एएफएमसीसारख्या अकादमीतील निवडीसाठी या मुलींना चांगला फायदा होईल.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) किंवा नेव्हल अकादमीला (एनए) अधिकाधिक चांगले व दमदार प्रशिक्षणार्थी मिळावे आणि पुढे हे प्रशिक्षणार्थी लष्करातील सर्वोत्तम अधिकारी बनावे, या संकल्पनेतून १९६१ मध्ये मुलांसाठी सैनिकी शाळांची स्थापना झाली. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी एक, यानुसार या शाळा उभ्या झाल्या. अशा ३३ शाळा सध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सातारा व दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरला सुरू झालेली, अशा दोन शाळा आहेत. सातारा सैनिकी शाळेसह देशभरातील सर्व शाळा या एनडीए किंवा एनएला प्रशिक्षणार्थी पुरविणारी खाणच आहेत. आता मागील काही वर्षात लष्करी दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा, यासाठी केंद्र सरकारकडून धोरणात्मक तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता या सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या निर्णयानुसार, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी मुलींना सैनिकी शाळेत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यामध्ये फक्त सात शाळांचाच समावेश होता, त्यातील एक चंद्रपूर सैनिक शाळा होती. आता २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मात्र सर्व ३३ सरकारी सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता सहाव्या वर्गात प्रवेश परीक्षेद्वारे मुलींची यासाठी निवड होईल.

१०० नवीन शाळादेखील संलग्न

देशभरातील या सरकारी सैनिकी शाळा ‘सैनिक स्कूल सोसायटी’अंतर्गत आहेत. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आता आणखी १०० शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. या नव्या १०० शाळा सामाजिक संस्थांमार्फत उभ्या होतील व त्यादेखील याच सोसायटीशी संलग्न होणार असल्याचे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे.

‘एएफएमसी’साठी प्रवेश असा

सैनिकी शाळांचे शिक्षण हे १२व्या वर्गापर्यंतच असते. त्याचवेळी लष्करात अधिकारीपदी प्रवेशासाठी इयत्ता १२ नंतर एनडीए/नेव्हल अकादमी तसेच अन्य काही थेट मुलाखतीवर आधारित संधी असतात. या सर्व संधी सध्या फक्त मुलांनाच आहेत. सैनिकी शाळेतील छात्रसैनिकांची दरवर्षी चांगल्या संख्येने एनडीए किंवा नेव्हल अकादमीत निवड होत असते. याखेरीज लष्करी डॉक्टरांना तयार करण्यासाठी एएफएमसीची परीक्षाही असते. ही परीक्षा सध्या मुले व मुली, असे दोघेही देऊ शकतात. त्यामुळे आता मुलींना सैनिकी शाळेत प्रवेश खुला झाल्यानंतर तेथे शिकणाऱ्या मुली स्वत:ला ‘एएफएमसी’साठी तयार करू शकतील.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Shubhangi shivam Sharma says

    Meri ncc ho chili hai muje mil jayegi kya job mera bucpan ka sapna pura
    jayega sar

  2. Shivani Ashok Khade says

    Talathichi new exam kadhi hoil Ani Ms cit certificate nasel tr form bharta yeto ka,?

  3. Gayatri Patil says

    12th nanatr entry nhi ka?

  4. Lalita says

    Kdhi honr ah chalu

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड