मुंबई येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह अंतर्गत नोकरीची संधी, ₹२४,४७७ मानधन मिळणार त्वरित अर्ज करा – Sainik Girls Hostel Bharti 2025
Sainik Girls Hostel Bharti
Sainik Girls Hostel Bharti 2025
Sainik Girls Hostel Bharti: सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुज (पूर्व), मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रा. प्र. जाधव यांनी केले आहे. या पदसंबंधित जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरती बाबत अधिक आणि सखोल माहिती जाणून घेण्यासाठी या जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या पात्रता निकषांना पात्र करणाऱ्या उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सैनिक सेवेत बलिदान देणाऱ्या सैनिकांची पत्नी असावी. किंवा युद्ध विधवा असावी. तसेच माजी सैनिक आणि आजी सैनिकांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराने एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे आणि टायपिंगचे कौशल्य असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज कर्त्या उमेदवाराला वयोमायदे संबंधित पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. मुळात, वयोमर्यादा ४५ वर्षांच्या आत असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ₹२४,४७७ मानधन दिले जाईल. ही एक उत्तम संधी असून पात्रता निकषात पात्र उमेदवारांने नक्कीच या संधीचा फायदा घेण्यात यावा. अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रांची पुष्टता करणे अनिवार्य आहे. उमेदवाराने अर्जासोबत युद्ध विधवा, विधवा, किंवा माजी/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अर्ज वैध मानला जाणार नाही.
निवड प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारचे अंतिम बदल करण्याचा अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात, त्यामुळे अर्जदारांनी प्रक्रिया पूर्णतः समजून घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये काही शंका अथवा माहितीची आवश्यकता असल्यास, संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येते. अर्जाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर येथे थेट भेट देणे किंवा संपर्क साधणे सोयीचे ठरेल. कार्यालयाचा पत्ता आहे: सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रूज (पूर्व), मुंबई – ४०००५५.
दूरध्वनी क्रमांक ०२२-३५०८३७१७ वर देखील संपर्क साधता येईल. कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा आणि इतर माहिती तपासून योग्य वेळी भेट देणे किंवा कॉल करणे अधिक सोयीचे ठरेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रियेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे अर्जदारांना प्रक्रियेतील संभाव्य बदलांबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होईल आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल.
Sainik Girls Hostel Bharti : One post of Non-Government Assistant Hostel Superintendent is to be filled on contract basis for 175 days at Military Girls Hostel, Civil Lines near Hyslop College under District Soldier Welfare Office from Soldier Widows and Ex-Serviceman Widows category on net temporary basis with aggregate remuneration of Rs.23 thousand 283. Know More details about Sainik Girls Hostel Bharti 2023 at below
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतीगृह, हिस्लॉप कॉलेजजवळ सिव्हिल लाईन्स येथे सैनिक विधवा व माजी सैनिक विधवा प्रवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन 23 हजार 283 रुपये प्रमाणे कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतीगृह अधीक्षिकाचे एक पद 175 दिवसांसाठी भरावयाचे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पदांसाठी इच्छुक सैनिक विधवा, माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी केले आहे.
Sainik Girls Hostel Bharti
Sainik Girls Hostel Bharti -The post of Non-Govt Assistant Hostel Superintendent is to be filled on temporary contract basis in Army Girls Hostel. Interested women have been requested to apply at the District Soldier Welfare Office at Santacruz by the District Soldier Welfare Officer.
सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या – 01) या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे शिक्षण – दहावी उत्तीर्ण असावे. एमएससीआयटी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा – 30 ते ५० वर्षे असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल [email protected] वर संपर्क करावा.
Table of Contents
new udpate