दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील आरोग्य विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता सरसकट परीक्षा शुल्कमाफी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या सवलतीसाठी यापूर्वी लागू असलेली आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतल्याने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परीक्षा शुल्कमाफीचा लाभ वैद्यकीय शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी यांसारख्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवांना अधिकृत पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने विद्यापीठाने शासनाकडे आर्थिक तरतुदीची मागणी केली होती. हिवाळी सत्र २०२६ मध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण १ लाख ६ हजार ३०८ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीसाठी विद्यापीठाने ३७ कोटी ९२ लाख २ हजार ९७० रुपयांचा निधी मागितला होता. तसेच, पदव्युत्तर आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीबाबतही शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यावर राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयांचा आधार घेत सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्कमाफी देण्याचे आदेश दिले आहेत.
परीक्षा शुल्कमाफीची रक्कम कोणत्या विभागामार्फत दिली जाणार, याबाबतही शासनाने स्पष्टता दिली आहे. ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती वैद्यकीय शिक्षण विभागाकडून थेट विद्यापीठाला करण्यात येणार आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) आणि विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांना संबंधित विभागांकडून शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















