आरटीई पहिल्या सोडतीतील प्रवेशासाठी ३१ पर्यंत मुदत
RTE Nashik Admission 2020-2021
RTE Nashik Admission 2020-2021 : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या सोडतीच्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. दरम्यान, अद्याप मोठ्या संख्येने जागा रिक्त असताना, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेत जलदगती आणावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता पालकांकडून व्यक्त केली जाते आहे.
आरटीई पहिल्या सोडतीतील प्रवेशासाठी ३१ पर्यंत मुदत
जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा उपलब्ध असून, प्रवेशासाठी तब्बल १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत पाच हजार ३०७ बालकांची निवड झाली. त्यांपैकी दोन हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही निम्म्याहून अधिक जागा रिक्त असून, शाळांची अध्ययन प्रक्रिया मात्र गतिशिल झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेशप्रक्रिया गतिशिल होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आटीईंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे पूर्णपणे अध्ययन होऊ शकणार नाही व त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : सकाळ