आरटीई प्रवेश प्रक्रिया !
rte admission 2020
RTE Admission 2020 – आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता अनलॉकमध्ये सरकारने आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केली आहे. मात्र, आता शहरातील बहुतांश खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचा आरक्षित प्रवेश क्षमता (कोटा) कमी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आली आहे. अशा शाळांचा कोटा तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश आरक्षित असतात. त्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई लागू झाल्यापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र, दरवर्षी काही ना काही अडचणींचा सामना पालकांना करावाच लागत आहेत. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाइन शाळा सुरू करावी लागल्याने अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. बहुतांशी शाळांना शुल्क आकारण्यावर अंकुश आले. नेमके करावे, म्हणून काही शाळांनी ही शक्कल लढविली आहे. संत तुकारामनगरमधील एका बड्या शाळेचे गेल्यावर्षी 30 जणांचा कोटा होता, त्यांनी आता 20 जागा दिल्या आहेत. असेच भोसरीतील एका शाळेने कोट्यात बदल केला आहे.
दरम्यान, मुळातच यावर्षी अनेक शाळांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी शहरात फक्त 179 शाळांचीच नोंदणी केली आहे. त्यानुसार 4 हजार 475 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. परस्पर कोटा बदल करणाऱ्या शाळांवर प्रशासन कारवाई करणार आहे की नाही, असा प्रश्न पालक शरण शिंगे यांनी केला आहे. शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे म्हणाले, “अशा शाळांबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करावी. अशा शाळांची तपासणी करण्यात येईल.”
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Job vacancy ahe ka MBA sadhi job details padhva