RRB Station Master Recruitment 2026 – भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. स्टेशन मास्टर या महत्वाच्या पदासाठी भरपूर पदांची मोठ्ठी भरती सुरु होणार आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज २७ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) स्टेशन मास्टर या मानाच्या आणि महत्त्वाच्या पदासाठी तब्बल १२५० रिक्त जागांवर बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय रोजगार सूचना क्रमांक CEN 08/2026 अंतर्गत या महाभरतीची संक्षिप्त सूचना अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या भरतीत जागांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांना रेल्वेतील या कायमस्वरूपी आणि सुरक्षित सेवेत रुजू होण्याची, तसेच यशस्वी होण्याची संधी कित्येक पटींनी वाढली आहे. पूर्वी ही भरती सामान्य ‘एनटीपीसी’ (NTPC) प्रक्रियेअंतर्गत घेतली जात असे, परंतु या वर्षापासून रेल्वे बोर्डाने स्टेशन मास्टर पदासाठी स्वतंत्रपणे विशेष भरती प्रक्रिया राबवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांमधील स्पर्धा अधिक सुटसुटीत होणार असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांचे रेल्वे अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार होण्यास मोठा हातभार लागणार आहे. स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या भरती साठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहे, तेव्हा आपले सगळे महत्वाचे खाली दिलेले कागदपत्र तयार ठेवा, तसेच पूर्ण माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, या रेल्वेच्या मोठ्या पदभरतीची सर्वात जमेची बाजू म्हणजे यातील शैक्षणिक पात्रता आणि मिळणारे भरघोस लाखावर वेतन होय. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पूर्णपणे पात्र आहेत. स्टेशन मास्टर हे पद सातव्या वेतन आयोगानुसार ‘पे-लेव्हल ६’ (Pay Level 6) अंतर्गत येते. निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० रुपये मूळ वेतनासह महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) आणि रात्रपाळीचे विशेष भत्ते मिळून दरमहा अत्यंत आकर्षक व उत्तम वेतनश्रेणी मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय सुविधा आणि रेल्वेचे कायमस्वरूपी नोकरीचे संरक्षण यामुळे हे पद तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत रेल्वे बोर्डाने मोठा बदल केला असून, किमान वयोमर्यादा १८ वरून वाढवून २० वर्षे करण्यात आली आहे, तर कमाल वयोमर्यादा ३० वर्षे (१ जानेवारी २०२७ रोजी) निश्चित करण्यात आली आहे; तसेच नियमानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत विशेष सूट दिली जाणार आहे. ता पदासाठी Pay Scale ₹35,400 to ₹1,12,400 या रेंज मध्ये असतो!
निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी रेल्वे बोर्डाने यावेळी नियमांत क्रांतिकारक बदल केले आहेत. आता उमेदवारांना पूर्वीप्रमाणे दोन टप्प्यांत (CBT-1 व CBT-2) परीक्षा न देता केवळ एकाच टप्प्याच्या मुख्य संगणकाधारित परीक्षेला (Single Stage CBT) सामोरे जावे लागणार आहे. या १०० गुणांच्या परीक्षेसाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल. यामध्ये बेसिक सायन्स व गणित आणि डेटा ॲनालिसिस (६० गुण), लॉजिकल कॅपेबिलिटी (२० गुण) आणि मेंटल रिझनिंग (२० गुण) असा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होणाऱ्या एकूण जागांच्या ८ पट उमेदवारांना संगणकाधारित अभिक्षमता चाचणीसाठी (CBAT / ॲप्टिट्यूड टेस्ट) बोलावले जाईल. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना संगणकीय परीक्षेचे ७० टक्के गुण आणि ॲप्टिट्यूड टेस्टचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. त्यानंतर कागदपत्र पडताळणी (DV) आणि ‘A-2’ वैद्यकीय मानकानुसार वैद्यकीय तपासणी करून उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल.
या महाभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२६ पासून अधिकृत पोर्टल rrbapply.gov.in वर सुरू होत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. अर्जासाठी सर्वसाधारण, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ५०० रुपये शुल्क असून, परीक्षा दिल्यानंतर ४०० रुपये परत केले जातील; तर अनुसूचित जाती, जमाती, महिला व दिव्यांग उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क असून ते संपूर्ण परत केले जाईल. अर्जात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि अर्ज रद्द होण्यापासून वाचण्यासाठी उमेदवारांनी आपल्या आधार कार्डावरील नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख ही दहावीच्या गुणपत्रकाशी तंतोतंत जुळणारी ठेवून आधार अपडेट ठेवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. स्टेशन मास्टर पदाच्या १,२५० एवढ्या प्रचंड जागा उपलब्ध झाल्याने नोकरी मिळण्याची संधी अनेक पटींनी वाढली असून, पदवीधर उमेदवारांनी कोणत्याही ऐनवेळच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मुदतीपूर्वीच आपले ऑनलाईन अर्ज सादर करून अभ्यासाला लागावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Important Links For www.indianrailways.gov.in Station Master Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/cMdHq |
| 👉ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | https://shorturl.at/JPWxh |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















