पुणे सुरक्षा रक्षक भरती २०२०
Rojgar Sandhi Jahirati
Pune Suraksha Rakshak Bharti 2020 – कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना स्वत:च्या कुटुंबाच्या काळजीपोटी गावचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे एकीकडे हाताला काम नसलेल्याची संख्या असतानाच दूसरीकडे मात्र परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे भूमीपुत्राना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
व्यावसायिक क्षेत्रात येणारे आयटी कंपन्या, विविध उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शासकीय व निमशासकिय कार्यालये ( निविदा प्रक्रिया पूर्ण), मॉल्स, मोठमोठ्या सोसायटया, अपार्टमेंट, पंचतारांकीत हॉटेल्स, गोडाऊन, छोट्या कंपन्या (शंभर पेक्षा कमी कामगार असणाऱ्या) अशा असंख्य ठिकाणी काम करणारे खासगी सुरक्षा रक्षक गावी निघुन गेल्याने तेथे खासगी सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झाली आहे.
अशी मिळेल सुरक्षा रक्षकाची नोकरी
परप्रांतीय सुरक्षा रक्षक गावी गेल्याने मराठी तरुणाना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.शहरात 800 ते 900 सुरक्षा रक्षक एजन्सी आहेत.त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात 60 हजारहून अधिक सुरक्षा रक्षकांची सध्या गरज आहे. नववी, दहावी उत्तीर्ण होणाऱ्याना प्राधान्य दिले जाणार आहे. 18 ते 35 या वयोगतातील तरुणाना ही संधी उपलब्ध असून त्यांना 12 हजार 500 ते 18 हजार रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पी फोर फाउंडेशनच्या नगर रोड येथील श्रमिक भवन येथे संपर्क साधु शकता किंवा [email protected] इमेलवर आपला बायोडेटा पाठवु शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात नोंदणीकृत तब्बल पावणे दोन लाख खासगी सुरक्षा रक्षक काम करत होते. त्यामध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी होती. परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगारांपैकी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम येथील रहिवासी असलेल्या 70 टक्के सुरक्षा रक्षकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे शहरामध्ये मागील दोन महिन्यापासुन खासगी सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवु लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणाना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिस प्रायव्हेट सिक्युरिटी.
“गेल्या दोन वर्षापासून पोलिस भरती झालेली नाही. त्यातच कोरोनामुळे पुणे, पिंपरी – चिंचवड व ग्रामीण भागात आता सुरक्षा रक्षकांची गरज भासत आहे. सध्या 60 हजार सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत. मराठी तरुणाना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.”
– सचिन मोरे, मुख्य समन्वयक, पी फोर फाउंडेशन
निगडी येथे सिकोरेटी जॉब मिळेल का