बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळावा ३० सप्टेंबरला सकाळी १० वा. दापोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तिमथ्य शरद मिसाळ यांनी केले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थांकडील विविध आस्थापना २५०० पेक्षा अधिक पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करणार आहेत. उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीवेळी बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नावीन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नावनोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खानवली विभाग हा विकासापासून वंचित राहिला आहे. आमदार राजन साळवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. रत्नसिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली या विभागात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे, असे शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल गुरव यांनी सांगितले. लांजा तालुक्यातील खानवली, हर्चे, भडे, वाघ्रट, वाडीलिंबू, कोट आगरगाव, उपळे, विरगाव, आगवे, जोशी गावातील बहुसंख्य लोकांचे शिंदे शिवसेनेला पाठबळ मिळत आहे. खानवली विभागात कोट्यवधींचा निधी व त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश यामुळे या विभागातील गावात शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. उबाठा गटातील अनेक शिवसैनिक शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















