अकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात
Rojgar Melava 2020 Details
Rojgar Melava 2020 Details – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिकमार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला गुरुवारी सुरुवात झाली. १ हजार ११५ जागांसाठी २८ ते ३० मे या दरम्यान हा मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्राकडील नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी साहाय्य होण्याच्या दृष्टीने हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केला असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येत आहे.
सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे या आस्थापनांमध्ये काम करणारे बरेचसे परप्रांतीय कामगार, मजूर हे त्यांचे गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. आता काही अटी व शर्तींचे पालन करून कंपन्या औद्योगिक अस्थापना व्यवसाय उद्योग हे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे समोर येत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी पात्र उमेदवारांच्या ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करण्यात येणार आहे.
यामध्ये फक्त ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्याच मुलाखती घेण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करून जॉब फेअर टॅबवर क्लिक करून नाशिक ऑनलाइन जॉब फेअर १ (२०२०-२१) यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाइन असल्याने व मुलाखती ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने या कार्यालयात प्रत्यक्षात कोणी हजर राहू नये व काही प्रश्न असल्यास ०२५३ २९७२१२१ या क्रमांकावर संपर्क करावा, अशे आवाहन उपआयुक्त सुनील सैंदाणे यांनी केले आहे.
मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे व २ वर्ष MSCT ट्रेनर म्हणुन व ६ महिने रिलायंस मार्केटमध्ये कॅशियरचा अनुभवी आहे.६५% कानाने अपंग आहे…मला कल्याण-डोंबिवलीमध्ये जाॅब मिळेल का ..?
कृपया मी विनंती करतो मला अपडेट सांगा…खुप अत्यावश्यक आहे…!
धन्यवाद !
माला शिपाईचे काम पाहिजे शिकक्षण १० वी आहे वय ४० आहे नाव प्रविण किसन खरात
Mi ex Army drawing Sathi+ supervisor Sathi jaga asatil tar kalava.nashik
Mi ex Army drawing Sathi+ supervisor Sathi jaga asatil tar kalava.
Chandrapur district sathi job pahije ahe khup sushikshtit berojgar mul ith pdun ahet tyanna job deta yeil yevhdya company chandrapur mdhe nhi so plz amha chandrapurkransathipn job dya