RojgaarSangam Portal Registration – तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या कामगार व रोजगार विभागाकडून ‘रोजगार संगम पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी शोधणारे उमेदवार आणि विविध कंपन्या एकाच व्यासपीठावर जोडल्या जातात. सरकारी विभागांतील आउटसोर्सिंग पदांपासून ते नामांकित खासगी कंपन्यांतील रिक्त जागांपर्यंतची माहिती या पोर्टलवर नियमितपणे उपलब्ध करून दिली जाते. रोजगार संगम पोर्टलवर राज्य सरकारच्या विविध विभागांतील आउटसोर्सिंग पदांसह खासगी कंपन्यांमधील रिक्त पदांची माहिती सातत्याने अद्ययावत केली जाते. उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभवाच्या आधारे योग्य नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.
या पोर्टलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नोंदणीकृत उमेदवारांची माहिती पाहून कंपन्या स्वतःच योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी निमंत्रण देऊ शकतात. या पोर्टलवर नोंदणी करणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही तरुणाला रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत नाही. या पोर्टलद्वारे उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहितीही उपलब्ध होते. मेळाव्याचे ठिकाण, तारीख आणि सहभागी कंपन्यांची माहिती पाहून इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. डिजिटल माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे हे पोर्टल राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असून, सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग उपलब्ध करून देत आहे. rojgaarsangam.up.gov.in/JobSeekerLogin या लिंक वरून आपण अर्ज सादर करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (Domicile Certificate)
कौशल्य प्रमाणपत्र (असल्यास)
पासपोर्ट आकाराचा फोटो व चालू मोबाईल नंबर/ईमेल
नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत
या पोर्टलवर नोंदणी करणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही तरुणाला रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत नाही.

अशी करा ऑनलाइन नोंदणी
रोजगार संगम पोर्टलवर मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून सहज नोंदणी करता येते.
- अधिकृत rojgaarsangam.up.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
- ‘Sign Up’ किंवा ‘New Account’ पर्याय निवडा.
- ‘Job Seeker’ हा पर्याय निवडून खाते तयार करा.
- नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पासवर्डची माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- त्यानंतर लॉगिन करून शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि कामाचा अनुभव यांची माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















