राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल पदांची भरती रखडली!!
Recruitment of College Librarian
Recruitment of College Librarian: The recruitment process for various posts in the aided senior colleges in the state has been stalled for the last several years due to various reasons, including the post of Librarian.
Recruitment of College Librarian – राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल पदांची भरती रखडली!! महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, महाविद्यालयांतील हे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध पदांची भरतीप्रक्रिया ही गत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडली असून यात प्रामुख्याने ग्रंथपाल पदांचाही समावेश आहे. कोरोनामुळे महाविद्यालय ग्रंथपालांसह इतर पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सन २०१८ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ग्रंथपाल पदांच्या १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. मात्र, भरतीप्रक्रिया वारंवार स्थगित करण्यात आल्याने पात्रताधारक उच्चशिक्षित उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयांतील ग्रंथपालांची भरती प्रक्रिया बंद असताना शिक्षण संस्थांकडून ग्रंथालयांमध्ये मानधन तत्वावरही पात्रताधारक उमेदवारांच्या नियुक्त्या होत नसल्याने उच्च शिक्षण घेऊन बसलेले पात्रताधारक हवालदिल झाले असून ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App