पोस्ट खात्यात ५ हजार जागांसाठी भरती सुरु
Recruitment for Five Thousand Vacancies in Postal Department
देशात मंदीचे सावट असताना, ऑटो सेक्टरसह विविध क्षेत्रांतून अनेकांवर नोकर्या गमावण्याची वेळ ओढवलेली असताना बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. डाक विभागात 15 ऑक्टोबरपासून 5 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशात 2 हजार 707, छत्तीसगडमध्ये 1 हजार 799 आणि तेलंगणात 970 जागांची भरती केली जाणार आहे. अधिक माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.
सविस्तर माहिती appost.in/gdsonline या संकेत स्थळावर आहे. पात्र उमेदवाराला किमान 10 हजार रुपये तर कमाल 14 हजार 500 रुपये वेतन मिळणार आहे. ब्रँच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांसाठी ही भरती आहे. वयाची अट 18 ते 40 आहे. दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : पुढारी