Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RBI परीक्षा मराठीसह अन्य 16 भाषांतून होणार!

RBI Recruitment

RBI Recruitment  : परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.

मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.


RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. बँकेत ज्युनिअर इंजिनीअर, ग्रेड बी ऑफिसर, सिक्युरिटी गार्ड पदांवर भरती प्रक्रिया सुरू असतानाच नोकरभरतीची एक आणखी जाहिरात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लीगल ऑफिसर (ग्रेड बी), मॅनेजर (टेक-सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) आणि असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) या पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – 642 पदे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इच्छुक उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार १० मार्च २०२१ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.

RBI Recruitment Vacancy Details – पदांची नावे

  • लीगल ऑफिसर (ग्रेड बी) – ११ पदे
  • मॅनेजर (टेक-सिव्हिल) – १ पद
  • असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) १२ पदे
  • असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) – ५ पदे
  • एकूण पदे – २९

How to Apply – अर्ज कसा करायचा?

आरबीआयच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर सेक्शनवर जावे. यानंतर २३ फेब्रुवारी या तारखेसह उपलब्थ करण्यात आलेल्या अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर विचारलेली माहिती भरून नोंदणी करावी. यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा यूजर नेम आणि पासवर्डसह लॉगइन करून अॅप्लिकेशन सबमिट करावे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Ravindra jogdand says

    Sir,
    Ya job chi interview kuthe ahe

  2. Manoj tamboli says

    Raigad madhe vacancies ahet ka

  3. Bhagyashri Amit Ukey says

    Sir,
    Ya job chi interview kuthe ahe

  4. Yogita kamble says

    I want job data entry

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड