रिझर्व्ह बँकेत १९९ जागा भरणार

RBI Bharti 2019 For 199 Posts

रिझर्व्ह बँकेत १९९ जागा भरणार

भारतातील सर्व बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये दुय्यम श्रेणीतील डीआर, डीईपीआर आणि डीएसआयएम या १९९ रिक्त पदांची भरती होत असून त्यासाठी 11 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आरबीआय ग्रेड बी परीक्षा 2019 च्या माध्यमातून या जागांसाठी भरती केली होणार असून 9 नोव्हेंबरला परीक्षा होईल, असे आरबीआयने सांगितले.

आरबीआयच्या शाखांमध्ये होणाऱ्या भरतीत दोन विभागांत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. पेपर १ मध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार पेपर २ साठी पात्र ठरतली. दोन्ही परीक्षांचे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यातील उमेवारांची मुलाखत घेण्यात येईल. आरबीआय ग्रेड बी पहिली परीक्षा ९ नोव्हेंबर, दुसरी परीक्षा १ डिसेंबर रोजी होईल. डीईपीआर आणि डीएसआयएम परीक्षेचा दुसरा टप्पा २ डिसेंबर रोजी असेल. १९९ पैकी सामान्य श्रेणीत १५६, डीईपीआरमध्ये २०, तर डीएसआयएमच्या २३ जागा भरण्यात येणार आहे. भरतीप्रक्रियेची माहिती व अर्ज सादर करण्याची इच्छुकांनी https://www.rbi.org.in/ या वेबसाइटचा वापर करावा, असे आरबीआयने सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात / अर्ज

नियुक्त होणाऱ्यांना ७७ हजार २०८ रुपये मासिक वेतन असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद येथे होईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पुणे, नागपूर व मुंबईत होईल, असेही आरबीआयने सांगितले आहे.

इथे नोंदवा तक्रार

भरतीप्रक्रियेच्या संदर्भात काही अडचण असल्यास अथवा तक्रार नोंदणी करायची असल्यास http://cgrs.ibps.in या वेबसाइटचा वापर करावा. उमेदवारांनी नोंदविलेल्या तक्रारींचे मॅपिंग ऑनलाइन करता येणार असून प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटद्वारे जाहीर होणाऱ्या सूचनाच ग्राह्य धराव्यात, इतर ठिकाणी चुकीची माहिती दिली जात असल्यास तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Tejashree says

    Kiti kalawadi lagel job sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड