देशभरातील बेरोजगार तरुणांसाठी भारतीय रेल्वेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) लवकरच सहायक लोको पायलट (ALP) पदांसाठी ९,९७० हून अधिक जागा भरणार आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

१० एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू?
मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकृत अधिसूचना ९ एप्रिल २०२५ पर्यंत जाहीर केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती पाहावी. जाहिरात या लिंक वर उपलब्ध आहे
कोणत्या झोनमध्ये किती जागा?
रेल्वेच्या विविध विभागांमध्ये सहाय्यक लोको पायलटच्या पदांसाठी मोठी भरती होणार आहे. त्यामध्ये –
पूर्व किनारा रेल्वे – १,४६१ पदे
उत्तर पश्चिम रेल्वे – ६७९ पदे
दक्षिण मध्य रेल्वे – ९८९ पदे
पश्चिम रेल्वे – ८८५ पदे
मेट्रो रेल्वे कोलकाता – २२५ पदे
चार टप्प्यात निवड प्रक्रिया
ALP पदासाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाईल. या टप्प्यांमध्ये –
CBT 1 – संगणक आधारित प्राथमिक चाचणी
CBT 2 – मुख्य संगणक आधारित चाचणी
CBAT – संगणक आधारित अभियोग्यता चाचणी
कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
वयोमर्यादा आणि शुल्क माहिती
या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज शुल्क श्रेणीनुसार ठरवण्यात आले आहे –
सामान्य/OBC उमेदवार – ₹५००
SC/ST/PWD/महिला/अल्पसंख्याक उमेदवार – ₹२५०
रेल्वेत स्थिर आणि आकर्षक करिअर
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी रोजगार देणारी संस्था असून, ALP पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, भत्ते आणि इतर सुविधांचा लाभ मिळेल. तसेच, रेल्वेच्या परिचालनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळेल.
अर्ज करण्यास उशीर नको!
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळेवर अर्ज करावा आणि संधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी तयारी सुरू करा आणि स्वप्नातील सरकारी नोकरी मिळवा!
१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेतील सहायक लोको पायलटसाठी भर्ती सुरु,9970 पदांची जाहिरात आली!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















