Railway Exam Language Update 2026
रेल्वे भरती परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता रेल्वे परीक्षा मराठीतूनही देता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी रेल्वेच्या बहुतांश परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतल्या जात होत्या. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रश्न समजण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देता येणार आहे.
रेल्वे भरती प्रक्रियेत स्थानिक भाषांना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होत होता. मात्र, यावेळी हा मुद्दा चांगलाच तापला आणि त्यानंतर मध्य रेल्वेला आपला निर्णय बदलावा लागला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भरती प्रक्रियेत मराठीचा समावेश करण्यात आला.
घडामोडींची सुरुवात १६ मार्च २०२६ रोजी झाली. मध्य रेल्वेने जाहीर केलल्या अधिसूचनेत परीक्षा देण्यासाठी फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय दिला होता. महाराष्ट्रात भरती होत असतानाही मराठी भाषेला पूर्णपणे वगळण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. स्थानिक भाषेचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली. या प्रकरणात मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतली. अमित ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. त्यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारत स्पष्ट इशारा दिला की, भरती प्रक्रियेत मराठीचा समावेश केला नाही, तर मनसे आंदोलनाचा मार्ग अवलंबेल. त्यानंतर १६ मार्च रोजी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आली. २२ एप्रिल २०२६ रोजी नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली. या अधिसूचनेत मोठा बदल करत मराठी भाषेचा समावेश करण्यात आला.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















