पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेगळ्या पद्धतींनी होणार
Pune University Will Change Examination System Due to Corona virus
‘कोरोना’मुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडले असले तरी भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही. परंतु, परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर १ एप्रिल ते १४ एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
‘कोरोना’ संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या पूर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तर पदव्युत्तर व व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ‘कोरोना’मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागविल्या होत्या. त्यात १०० पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करून नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाईल.
१३ ते १७ मार्च या कालावधीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही पेपर झाले आहेत. तसेच त्यांना क्रेडिट सिस्टीम असल्याने या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षा जाताना मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या एमसेक्यु किंवा कमी गुणांची यासह इतर प्रकारे परीक्षा होणार आहेत. याचा निर्णय लवकरच परीक्षा मंडळात घेतला जाईल. प्रथम वर्षाची परीक्षा रद्द होणार नाही, असे उमराणी यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : सकाळ