Pune University: अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी
Pune University to Offer Chance to Old Students to Complete UG PG Courses
Pune University to Offer Chance to Old Students to Complete UG PG Courses : Savitribai Phule Pune University has given an opportunity to the students who cannot complete higher education to complete undergraduate and postgraduate courses. As per the notification of the University Commission (UGC), Pune University has made some important changes in the rules.
Pune University: अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी – उच्च शिक्षणात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेणाऱया काही विद्यार्थ्यांना आर्थिक-कौटुंबिक, शारीरिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची मुभा नसल्याने अनेकांना पदवीपासून वंचित राहावे लागते. पण आता या विद्यार्थ्यांना त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. उच्च शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली आहे.
‘यूजीसी’ने अधिसूचना प्रसिद्ध करून विद्यापीठांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने जुन्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन पदवी मिळवण्याची सुविधा प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमांत बदलही करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पूर्वीच्या जुन्या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. संबंधित जुने विद्यार्थ्यांना सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विषय घेऊन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळेल