सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत परीक्षा सेवा पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. आजपासून (दि. २३ जून) विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना संबंधित grievance.unipune.ac.in पोर्टलचा वापर करता येणार आहे. या माध्यमातून परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल तसेच निकालोत्तर अनेक त्रुटी या सुविधेमुळे दूर होतील आणि पर्यायाने विद्यार्थी, महाविद्यालये व परिसंस्था यांना परीक्षा व मूल्यमापनाच्या संदर्भातील सर्व दुरुस्त्या, निर्णय किंवा इतर गोष्टीही कागदविरहित उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा व मूल्यमापनविषयक विद्यार्थिकेंद्रित सर्व सेवा कागदविरहित करण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा सुरू केला आहे. त्यानुसार परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल तसेच महाविद्यालयांना परीक्षा, मूल्यमापनासह निकालांमधील त्रुटी करता येणार दुरुस्त निकालोत्तर अनेक त्रुटी या सुविधेमुळे अद्ययावत दुरुस्त होतील आणि पर्यायाने विद्यार्थी, महाविद्यालये व परिसंस्था यांना परीक्षा व मूल्यमापनासंदर्भातील सर्व दुरुस्त्या, निर्णय किंवा इतर गोष्टीही कागदविरहित उपलब्ध होणार आहेत.
सर्व महाविद्यालये, परिसंस्था यांना निर्देशित करण्यात येत आहे की, परीक्षा व मूल्यमापन सेवा या पोर्टलविषयी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व परीक्षा मूल्यमापनात सहभागी व्यक्तींना अवगत करावे आणि इथून पुढे तत्काळ याच पोर्टलद्वारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे प्रस्ताव, अर्ज, विनंती सादर कराव्यात. या प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठामार्फत ऑनलाईन लिंक grievance. unipune.ac.in दिली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















