Pune University – UG, PG अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर
Pune University Exams
SPPU Result 2021 Declared
Pune University Exams : Savitribai Phule Pune University has released the results of examinations for several courses including B.Sc, Bachelor in Hotel Management and Catering Tech, MCom and MBA.
Pune University – UG, PG अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर. सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटीने बीएससी (B.Sc), बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक, एमकॉम (MCom) आणि एमबीए (MBA) सह अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांनी पुणे विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ unipune.ac.in वर जाऊन आपला निकाल पाहावा आणि डाऊनलोड करावा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कसा तपासावा SPPU Result 2021 –
- १: एसपीपीयूच्या अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर जा
- २: होमपेज वर, उपलब्ध निकालाच्या लिंक वर क्लिक करा
- ३: एक नवं पेज उघडेल, येथे अभ्यासक्रमाच्या लिंकवर क्लिक करावे
- ४: आवश्यक ती माहिती भरून लॉग-इन करून सबमिट बटणावर क्लिक करा
- ५: निकाल कॉम्प्युटर स्क्रीन वर उघडेल
- ६: कॉम्प्युटर की-बोर्डवर ctrl+f टाइप करा आणि आपला निकाल पाहा
- ७: हे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा
Pune University Session II Exam
Pune University Exams : Online application process for Pune University Session II exam started. It was decided to start the examination of the second session in phases online from June 15. Students have to fill the application within 15 days.
Pune University – सत्र II परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा टप्प्याटप्प्याने १५ जूनपासून ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांनी १५ दिवसांत अर्ज भरायचा आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्र परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांत अर्ज भरावा लागणार आहे. परीक्षांचे नियोजन कमी कालावधीत योग्य पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाइटवरून अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे.
Pune University Exams – पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर
Pune University Exams – Post Graduate Examinations of Pune University have been announced. This has been a great relief to the students. Students studying these subjects in universities and colleges affiliated with the university will be able to take these exams online.
पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर. पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा देता येणार आहेत.
राज्यशास्त्र विभाग, डिफेन्स स्टडीज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याप्रमाणेच मे महिन्यामध्ये विद्यापीठातील प्रत्येक विभागाशी संलग्न असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
Pune University Exams – अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये
Pune University Exams: Savitribai Phule Pune University has planned to conduct online semester examinations for the final year of various courses in June so that the final year students of undergraduate and postgraduate courses do not face any difficulty in higher education or research abroad.
Pune University – अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परराज्यात किंवा परदेशात उच्च शिक्षण, संशोधनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन सत्र परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे.
या परीक्षेचा संपूर्ण निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करून विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्रे तातडीने देण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठांच्या सत्र परीक्षांबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सत्र परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
पुणे विद्यापीठाकडून साधारण १० ते १५ मे या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना साधारण ३१ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपासून जाहीर होण्यास सुरुवात होईल. कोणतीही अडचण उद्भवली नाही, तर संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल १५ ऑगस्टपर्यत जाहीर होतील.
पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आजपासून सुरू
Pune University Exams : Online examination of Pune University starts today. Pune University’s online exams are starting from Saturday. War rooms will be set up to avoid technical difficulties. About six lakh students from Pune, Nagar, and Nashik districts will be enrolled for these examinations.
पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आजपासून सुरू. पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा शनिवारपासून सुरू होत आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ‘वॉर रुम’ सज्ज ठेवण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहा लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Pune University Exams 2021) पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा ‘ऑनलाइन प्रॉक्टर्ड’ पद्धतीने होणार आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरबसल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटरवर देता येईल.ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करण्यात येणार आहे.
पुणे विद्यापीठ परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
Pune University Exams : पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 11 एप्रिलपासून होणार. परीक्षेचे नवीन वेल्प्तर्क 25 मार्चपर्यंत जाहीर होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून निर्माण झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. हि परीक्षा 11 एप्रिलपासून होणार आहे.
प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून सुरु केली जाईल. त्याचे वेळापत्रक 20 ते 25 मार्चदरम्यान जाहीर होईल. हि परीक्षा विद्यापीठाची स्वतःची कंपनी असलेली SSPU Educated Foundation हि कंपनी करेल. 50:20 चे सूत्र रद्द केले असून, सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षांच्या परीक्षा 50 गुणांची MCQ पद्धतीने होईल.
Pune University Exams : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षासोबत सर्वच वर्षांच्या सत्र परीक्षा ‘एमसीक्यू’ स्वरूपात ऑनलाइन ‘प्रॉक्टर्ड’ पद्धतीने होणार आहे. तर, अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये ‘एमसीक्यू’सोबत चार प्रश्न सब्जेक्टिव्ह स्वरूपात विचारण्यात येईल, असा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षा २० मार्चपासून, तर इतर वर्षाच्या परीक्षा ३० मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी आणि संघटनांनी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना मोबाइल, लॅपटॉप, टॅब, कम्प्युटरवर देता येईल. अंतिम वर्षाच्या परीक्षा ७० गुणांच्या होणार असून, त्यामध्ये ५० गुणांचे ‘एमसीक्यू’, तर २० गुणांचे चार ‘सब्जेक्टिव्ह’ प्रश्न विचारण्यात येतील.
इतर सर्व वर्षांच्या परीक्षा ५० गुणांच्या एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. या परीक्षांसाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला आहे. करोनाच्या प्रादुर्वाभामुळे बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगर व्यावसायिक पारंपरिक अभ्यासक्रमांचे ऑनलाइन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाल्याने त्यांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होतील, अशी माहिती मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी ‘प्रॉक्टर्ड’चा अवलंब
पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा ‘प्रॉक्टर्ड’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकार सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्याला पाच संधी देण्यात येतील. मात्र, त्यानंतरही गैरप्रकार सुरू राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यावर कॉपी प्रकरणाच्या कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
कोणत्याही अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष महत्त्वाचे असते. अंतिम वर्षाच्या निकालानुसार विद्यार्थ्यांची नोकरी किंवा उच्चशिक्षणासाठी वाटचाल ठरते. यंदा करोनामुळे अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा महाविद्यालयात घेण्यात येण्याची शक्यता आहे. या परीक्षा कोणत्या पद्धतीने आयोजित करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजेमेंट अँड टेक्नॉलॉजी अशा व्यावसायिक अभ्याक्रमांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया संपली असून, विधी अभ्यासक्रमाची प्रक्रियाही येत्या काही दिवसांत संपेल. त्यामुळे अंतिम वर्षांसोबतच इतर वर्षाच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम पूर्ण ठेवावा की त्यात कपात करावी, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितीच्या अहवालानंतर परीक्षांसंबंधी सविस्तर परिपत्रक व वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
सोर्स : म. टा.
Pune University Exams : pune university first year semester exams likely to be conducted in February – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रवारीच्या अखेरीस घेण्याबाबत पडताळणी सुरू असून, या परीक्षा वेळेत पार पाडण्यासाठी ऑनलाइन पद्धतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना, त्यात एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे. याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे. त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे.
याउलट ऑफलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजन केल्यास, साधारण दोन महिने परीक्षा घेण्यासाठी लागतील; तसेच निकाल जाहीर करण्यास ४५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता ऑनलाइन परीक्षा घेणे सोयीस्कर ठरेल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासोबतच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची पक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत पडताळणी सुरू आहे.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
सत्र परीक्षांचे प्रस्तावित नियोजन
- जानेवारी – अर्ज भरण्याची प्रक्रिया
- फेब्रुवारीअखेरीस – परीक्षांना सुरुवात
- मार्च – परीक्षा पूर्ण होणे
- एप्रिल – निकाल जाहीर होणे
सोर्स : म. टा.
Pune University Exams : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे फेब्रुवारी महिन्यात प्रथम सत्राच्या परीक्षा होणार आहेत. त्या ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत अद्याप विद्यापीठाचा निर्णय गुलदस्त्यात आहे. गुणवत्ता राखण्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याचा एक मतप्रवाह असताना कोरोनाचा प्रादुर्भाव, थेट परीक्षेतील येणाऱ्या अडचणींमुळे ऑनलाइन परीक्षा होऊ शकते, असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये प्राधान्याने प्रात्यक्षिकांचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठासह महाविद्यालयांकडून सुरू आहे. प्रथम सत्राचा जवळपास सर्वच अभ्यासक्रम संपला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांकडून प्रथम सत्राच्या परीक्षांचे नियोजन पूर्ण केले असून, काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. पण अद्याप पुणे विद्यापीठाकडून याबाबत स्पष्टता आलेली नसल्याने विद्यार्थ्यांकडून याबाबत चौकशी केली जात आहे. दरम्यान, काही संघटनांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना अंतिम वर्ष आणि बॅकलॉग परीक्षेप्रमाणे प्रथम सत्राची नियमित परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी केली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “गुणवत्ता राखण्यासाठी ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, पण परिस्थिती योग्य नसल्यास ऑनलाइन वैयक्तिक उपकरणांऐवजी महाविद्यालयांच्या संगणक प्रयोगशाळेत प्राध्यापकांच्या उपस्थितीत घेतली जावी. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात येणाऱ्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली, त्यामध्ये प्रश्न काढताना गुणवत्ता राखली जाईल याकडे लक्ष द्यावे, चुका टाळाव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.”
“वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्यापरिषदेशी संबंधित अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक पुढच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता ही परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने ऑनलाइन घेणे योग्य ठरेल. पण याबाबतचा अंतिम निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत होईल,” असे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.
मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, “सध्या तरी ऑफलाइन परीक्षेची चर्चा सुरू आहे, पण परीक्षा कशी होणार यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.
विद्यार्थी संघटनांची कोलांटीउडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. त्यासाठी सोशल मीडियातून मोहीम देखील चालवली होती. मात्र, परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाले, अनेक अभ्यासक्रमांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. यात विद्यार्थ्यांचा फायदा असल्याने दोन महिन्यातच विद्यार्थी संघटनांनी भूमिका बदलून आता ऑफलाइन नको ऑनलाइनच परीक्षा घ्या, अशी मागणी लावून धरली आहे.
सोर्स : सकाळ
Pune University Exams : Pune University Online Exams will be held by produst method – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) ८ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने (Proctored Method) होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
विद्यार्थ्यांना अनेक दिवस अभ्यासाला मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचा विद्यार्थ्यांना अंदाज येण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ३ ते ५ डिसेंबर दरम्यान सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली असून, पहिल्या दिवशी ४५ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली. विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या. त्यानंतर आता विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणीसुधार परीक्षा होणार आहेत. या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ, नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांमध्ये या अडचणींची पुनरावृत्ती न होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत.श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी ४५ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रॉक्टर्ड -Pune University Exams
या परीक्षा पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परीक्षार्थींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी कॅमेराचा वापर करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचे काही छायाचित्रे देखील काढण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त अन्य हालचाली झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबतचा इशारा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. साधारण वीस इशारे देण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गैरप्रकार करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठाने चांगला निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
पुन्हा शून्य गुण आणि अनुत्तीर्ण ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक समस्या उद्भवल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला असून, ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्टुडन्ट प्रोफाइलवर पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. या निकालात नियमानुसार काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांच्या शून्य गुण मिळाल्याच्या; तसेच कमी गुण मिळाल्याच्या अडचणी विद्यापीठाकडे येत आहेत. या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेउन ठेवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ काय निर्णय घेण्यात येतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
ITI bekri tichr job
Job 100 %milta kya