पुणे विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर!!
Pune University Academic Timetable
Pune University Academic Timetable : The University has announced the academic schedule of undergraduate and postgraduate courses for the coming academic year 2021-22 of the Department of Education and affiliated colleges.
Pune University Academic Timetable – पुणे विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर!! पुणे विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगरव्यवसायिक अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे शैक्षणिक वर्ष येत्या १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज्यात बारावीच्या परीक्षांबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही, त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश कधी होणार हा प्रश्न कायम आहे.
विद्यापीठाने शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयांच्या आगामी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगरव्यवसायिक अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे शैक्षणिक वर्ष येत्या १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम सत्र १५ जून २०२१ ते २० ऑक्टोबर २०२१, तर दुसरे सत्र १५ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ या दरम्यान पार पडेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज, इंटरडिसीप्लिनरी अशा चारही विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षांसोबतच इतर वर्षांचे प्रथम सत्र आणि दुसऱ्या सत्राचे शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. सध्या सर्व अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष पुढे ढकलले जाऊ शकते.