खुशखबर! २०२४ पासून रखडलेल्या कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!
Pune MahanagarPalika Vacancies
Pune MahanagarPalika Vacancies : पुढारी वृत्तसेवा गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार आता १७१ जागांसाठी जाहिरात भरती प्रक्रिया या पदांसाठी दीड वर्षापूर्वी अर्ज केलेल्या २७ हजार ८७९ उमेदवारांचे अर्ज कायम ठेवण्याचे निर्देशही नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाच्या ११३ पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने जानेवारी २०२४ ला जाहिरात प्रसिद्ध केली होती.
त्यासाठी २७ हजार ८७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदु नियमावली लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेकडून संबंधित भरतीच्या जाहिरातीत सामाजिक आरक्षण, शैक्षणिक मागास वर्गाकरिताचे आरक्षण टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे शासनाने याबाबत बिंदु नियमावलीची नोंद अद्ययावत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बिंदु नियमावलीची नोंद अद्ययावत करत सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षण टाकून भरतीसाठी सुधारित जाहिरात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत ही भरती प्रक्रिया दीड वर्ष रखडली. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी या पूर्वी आलेल्या २७ हजार ८७९ उमेदवारांच्या अर्जाचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर महापालिकेने नगरविकास विभागाकडून अभिप्राय मागविला होता. त्यावर ‘नगरविकास’ने महापालिकेने दिलेल्या ११३ पदांच्या जाहिरातीऐवजी आता रिक्त असलेल्या १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची कार्यवाही राबविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वयोमर्यादा ओलांडलेल्या अर्जदारांना दिलासा
नगरविकास विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार, जानेवारी २०२४ मध्ये ज्या २७ हजार ८७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची संधी देण्यात यावी. तसेच, ज्यांचे पूर्वीचे अर्ज आहेत, त्यामधील ज्यांनी वयाच्या मर्यादा ओलांडली आहे, अशा उमेदवारांना सुधारित जाहिरातीद्वारे अर्ज करण्याची मुभा देण्यात यावी, असेही निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.