पुण्यात १८,००० नोकऱ्यांची संधी !

Pune 18000 Job Vacancies

Pune 18000 Job Vacancies  – पुण्यात १८,००० नोकऱ्यांची संधी – दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात येत असलेले 15 पैकी 8 उद्योग पुण्यात येणार आहेत. त्यातील 5 उद्योग लॉजिस्टिक्‍स क्षेत्रातील आहेत. हे उद्योग 10 हजार 505 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून शहरात 18 हजार 482 जणांना थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योग क्षेत्राने या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.




“मॅग्नेटिक महाराष्ट्र” अतंर्गत राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी 15 कंपन्यांशी करार केले आहेत. त्या कंपन्या राज्याच्या विविध भागांत 34 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या पैकी 8 कंपन्या पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडी भागात येणार आहेत. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. “ऑटोमोबाईल”, “IT” आणि सेवा क्षेत्राचे हब असलेल्या पुण्याला आता “लॉजिस्टिक्‍स” कंपन्याही पसंती देऊ लागल्या आहेत, हे आता अधोरेखित झाले आहे, असे विभागीय उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्‍स कंपन्या केवळ सुट्या भागांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या नाहीत तर, आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या ग्राहकाला सर्व सुविधा एकाच छताखाली देणाऱ्या त्या कंपन्या आहेत. वेअर हौसिंग, कस्टम्स आणि मटेरिअल मॅनेजमेंटच्या सुविधा त्या देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पुण्याचा औद्योगिक चेहरा-मोहरा बदलू शकतो, असे मत “MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चे प्र- कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी व्यक्त केले. पुुणे आणि परिसरात “MBA” ची 100 पेक्षा जास्त तर, अभियांत्रिकीची 50 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या उद्योगांना नजीकच्या काळात कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्‍वास आहे, ही समाधानाची बाब आहे. कोरोनानंतरच्या काळात पुण्याचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे उद्योग येत आहेत. आता अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि कार्गोचा प्रश्‍न सुटावा, एवढीच अपेक्षा आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Kailas says

    Rannangon

  2. Sanjay kamble says

    Rahaychi jevnach soy ani govrment job ahe ka

  3. Atish says

    मी दहावी पास झालो आहे

  4. Vikram rokade says

    Job sathi apply karat ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड