अकरावी प्रवेश २०२०- 11th Admission 2020 Timetable
Pune 11th Admission 2020
Pune 11th Admission 2020 Timetable & Details Schedule details at mock.demo.registration : 11th Admission process for pune city is declared now. Check the Important Dates for the admission of 11th Class. The Date wise schedule of an admission is given below. The Registration Process for the Pune 11 Admission 2020 will start from 22 July 2020. The Round Details & Online registration details with step wise instruction are given below. The candidates must read all details carefully & then proceed for application process. The Help Line Number For registration process is 09823009801. Last year admission website was pune.11thadmission.net but this year the website is pune.11thadmission.org.in.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी उशीरा जाहीर करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mock.Demo.Registration या नावाने लिंक असणार आहे. ही लिंक ओपन करून विद्यार्थ्यांना सराव अर्ज भरता येणार आहे.
सरावाचा अर्ज कायमचा नाही
मूळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी आठ दिवसांच्या कालावधीसाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी प्रारूप लॉगीन सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी भरलेली माहिती नष्ट करून मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपासून असणार आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी, पालकांनी घ्यावी.
मुख्याध्यापकांचीही जबाबदारी वाढली
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावी तसेच विद्यार्थी / पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गतवर्षीचेच लॉगीन आय.डी. व पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज अप्रूव्ह करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाईनच करावयाची आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता थेट कार्यवाही करण्याचेही आदेश शिक्षण प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत
असे असणार प्रवेशाचे टप्पे
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग-1 भरणे व प्रवेश अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला आहे याची खात्री करणे. ही प्रक्रिया 26 जुलै, 2020 पासून सुरू होईल. चाचपणी विद्यार्थ्यांनी स्वतः व पालक/ शाळांच्या मदतीने करण्याची आहे.
विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग -1 ऑनलाईन तपासून व्हेरीफाय करणे. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे. ही प्रक्रिया 27 जुलै, 2020 पासून संबंधित शाळा / मार्गदर्शन केंद्र करतील.
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे त्याचबरोबर नवीन अर्ज भाग-1 सुद्धा भरता येणार आहे. ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया विद्यार्थी स्वतः, पालक/ शाळांच्या मदतीने करावयाची आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे : (Important Dates For Pune 11th Admission process 2020 at mock.demo.registration)
- २२ जुलैपर्यंत – उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे : मुख्याध्यापक/ प्राचार्य
- २४ जुलैपर्यंत – उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित/ व्हेरिफाय करणे : विभागीय शिक्षण उपसंचालक
- २६ जुलैपासून – अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग – एक भरणे आणि अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
- २७ जुलैपासून – विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग- एक तपासून व्हेरिफाय करणे (आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधणे) : संबंधित शाळा/ मार्गदर्शन केंद्र
- – विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे (नवीन अर्ज भाग -एक सुध्दा भरता येईल) : कालावधी राज्य मंडळाचा दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येईल : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
अर्ज भरण्याचा करा सराव
विद्यार्थ्यांना मूळ अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये, अर्ज भरण्याचा सराव व्हावा, मुळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी सराव अर्ज भरण्याची सोय उपल5 करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप संकेतस्थळावर सुविधा देण्यात येत आहे. त्यात भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी १६ जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत संकेतस्थळावर Mock.Demo.Registration तपासा. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
Pune 11th Admission 2020 – मागील तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो. या वर्षी ११ वी प्रवेशप्रक्रियेमध्ये काही महत्वाचे बदल कोरोना मुले करण्यात आले आहेत. या बद्दल ची पूर्ण माहिती आपण बघूया. तसेच पुढील सर्व अपडेट्स साठी www.MahaBharti.in (महाभरती) ला नियमित भेट देत रहा.
शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यात सुरुवात होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो.
निकालानंतर अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्केवारीच्या आधारावर प्रकाशित करून महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. राज्यभरात दहावीसाठी जवळपास 16 लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. यापैकी जवळपास 75 ते 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. राज्यभरातील दोन हजारांवर महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
राज्यात कोरोनाचे सावट गडद असल्याने जुलै महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी शिक्षण विभागाने अकरावीचे पाच शहरातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले. महत्त्वाचे म्हणजे यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवरून माहिती पुस्तकांच्या विक्रीची मुभा न देता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती पुस्तिका बघून अर्ज भरावयाचा आहे. यासाठी ऑनलाइन शुल्कच भरावे लागणार आहे. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना बघण्यासाठी केवळ पाच माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. साधारणत: दहावीचा निकाल लागल्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेले बदल
- मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) 16 टक्क्यांऐवजी 12 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार.
- अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के राखीव जागांऐवजी चार टक्के जागांचा समावेश
- द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील
- यातील रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना वा प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्राधान्य
- नियमित फेरीनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या घेण्यात येतील
- विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील
FAQs
अकरावी प्रवेशसाठी अर्ज कधी पासून सुरु होणार ?
२६ जुलैपासून – अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग – एक भरणे आणि अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
कोणत्या जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ?
पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.
मी अर्ज कसा भरू शकतो ?
विद्यार्थ्यांना मूळ अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये, अर्ज भरण्याचा सराव व्हावा, मुळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी सराव अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप संकेतस्थळावर सुविधा देण्यात येत आहे.
Online form kasa bharaycha
How to get login I’d and password
Online admission
Akola Sathi Ahe Ka Online
How 10 student get their log in pass word to fill the 11 th online form