खुशखबर – विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची बंपर भरती, ऑनलाईन अर्ज करा | PSO Recruitment 2022
PSO Recruitment 2022
PSO Recruitment 2022
PSO Recruitment 2022: Special Security Division under State Intelligence Department, State of Maharashtra, Mumbai has declared a new recruitment notification for Police Constable/ Police Naik/ Police Constable, Unarmed Police Inspector/ Unarmed Assistant Police Inspector/ Sub-Inspector of Police posts. There are a total of 940 vacancies available to fill. Internal Departmental candidates apply online before the 18th of September 2022. Further details are as follows:-
राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विशेष सुरक्षा विभाग येथे संदर्भाधीन शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी धारण करीत असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील इच्छुक पोलीस अधिकारी (रा.रा.पो.बल वगळून)/ पोलीस अंमलदार (जिल्हा पोलीस दल व रा.रा.पो.बल सह) यांचेकडून विशेष सुरक्षा विभागामधील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विशेष सुरक्षा विभाग येथे पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई, निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक पदांच्या एकूण 940 रिक्त जागा विभागीय अतंर्गत (प्रतिनियुक्तीने) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक
- पदसंख्या – 940 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
How to Apply PSO Bharti 2022 | @mhpolice.pristineportal.net
- विशेष सुरक्षा विभागामध्ये प्रतिनियुक्तीने नेमणुकीसाठी अर्जदाराने एकदाच अर्ज सादर करावयाचा आहे.
- एकापेक्षा जास्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच एकापेक्षा अधिक विसुवि घटकामध्ये सादर केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- पोलीस अधिकारी / अंमलदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण, अचूक व खरी माहीती भरणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व त्यामुळे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील.
- अर्जदाराने शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळी त्यांचे ओळखपत्र व त्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छापिल (Print) प्रत सोबत घेवून येणे बंधनकारक असेल.
- अन्यथा उमेदवारांस शारिरीक क्षमता चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
PSO Recruitment- Important Dates
Selection Process For Personnel Security Officer Bharti 2022
- निवड प्रक्रिये अंतर्गत घेण्यात येणा-या वैद्यकिय तपासणी दरम्यान उमेदवार मानसिक रुग्ण, जुना आजार, उच्च रक्तदाब, उच्च मधुमेह, उच्च ताण इत्यादी सततच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल.
- शारीरिक क्षमता चाचणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी त्यांचे मुळ घटकानुसार http://www.mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- निवड प्रक्रीयेत पात्र ठरलेले पोलीस अधिकारी / अंमलदारांना ते ऑनलाईन अर्ज करतेवेळी ते ज्या पदावर कार्यरत होते त्याच पदावर त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात येईल.
- गुणवत्ता यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती ( Provisional selection ) असेल, गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणुन प्रतिनियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये.
- गुणवत्ता यादीनुसार पदे भरण्याचा अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षक, (व्ही.आय.पी.सुरक्षा ) विशेष सुरक्षा विभाग, मुंबई यांना आहे त्याबाबत अंमलदारांना कोणताही दावा करण्याचा हक्क राहणार नाही.
- विशेष सुरक्षा विभागासाठी शारीरिक क्षमता चाचणी पात्रतेनुसार गुणवत्ताक्रमाने येणा-या उमेदवारांना विशेष सुरक्षा विभागासाठी आवश्यक असलेले PSo Basic प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
- सदरचे प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या अधिकारी / अंमलदारांचाच विशेष सुरक्षा विभागामध्ये प्रतिनियुक्तीकरिता विचार करण्यात येईल.
- PSo Basic प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यास पोलीस अधिकारी/ अंमलदार यांना विसुवि प्रतिनियुक्तीकरीता अपात्र ठरविले जाईल.
- विशेष सुरक्षा विभागामध्ये जसजसे पदे रिक्त होतील त्याप्रमाणे अंमलदारांना प्रतिनियुक्ती दिली जाईल.
- निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना (अंमलदारांना) त्यांच्या मुळ घटकासाठी दर्शविण्यात आलेल्या
- विसुवि घटकामध्येच प्रतिनियुक्ती होईल, इतर विसुवि घटकामध्ये त्यांच्या प्रतिनियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Personnel Security Officer Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3x1Xks0 |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
mhpolice.pristineportal.net |
Other Related Links:
नवीन अपडेट!! राज्यातील पोलीस विभाग 940 पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त!!
Table of Contents