राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू ठेवली असली तरी, लाभार्थींना केवळ 1500 मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सध्याच्या अंदाजपत्रकात योजनेच्या निधीत कपात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.53 कोटी महिला लाभार्थी ठरल्या असून, आतापर्यंत 33,232 कोटी खर्च झाले आहेत. सुरुवातीला 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती, परंतु आता 2025-26 साठी फक्त 36,000 कोटींची तरतूद असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही मान्य केले. त्यांनी आपल्या कवितेतून “लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो… विकासाची केली कामे, म्हणून आम्ही पुन्हा आलो!” असे म्हणत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, महिलांच्या अपेक्षा आणि सरकारची कृती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















