प्राध्यापक भरती करा, ‘UGC’ कडून सहाव्यांदा निर्देश… ३१ जुलै पर्यंत माहिती देण्याचे निर्देश! – Professors Bharti 2024
professors Bharti 2024
Professors Bharti 2024
देशभरातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालयांना प्राध्यापक भरती करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१९ ते २०२१ या कालावधीत पाच वेळा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता नव्याने निर्देश देण्यात आले असून, प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबतची माहिती ३१ जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक दिले. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या जागा रिक्त राहिल्याने त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होतो. शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक टंचाई हा चिंताजनक विषय असल्याचे नमूद करून ‘यूजीसी’ने हस्तक्षेप करून प्राध्यापक भरती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही भरतीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्राध्यापक भरती करण्याचे स्मरण यूजीसीने करून दिले आहे. तसेच त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातही विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अलीकडेच राज्य शासनाने मान्यता दिलेल्या २०८८ पदांवर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्याशिवाय विद्यापीठांतील रिक्त जागा भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील २५ पैकी सुमारे १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी अधिष्ठाता नसल्यामुळे येथील कामकाजावर परिणाम झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या ४५ टक्के जागा रिक्त असून दुसरीकडे रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि तंत्रज्ञांची पदेही रिक्त आहेत. त्यातचही अनेक महत्त्वाची उपकरणेही गायब असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने पुरेशी तयारी न करताच प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, आधीच लागू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नाहीत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्याध्यांसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत, निवास आणि सुरक्षिततेचीही पुरेशी व्यवस्था नाही. अशा स्थितीत अलिबाग, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, बारामती या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबाबत विद्यार्थी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यातच सरकारकडून १० वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार असल्याची जाहिरात करण्यात आली होती आणि पुरेशी तरतूद नसताना २०२४-२५ मध्ये महाविद्यालयांमध्ये १००० जागा उपलब्ध होतील, असा दावाही करण्यात आला. मात्र, पुरेशा प्राध्यापक आणि उपकरणांच्या अभावामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रस्तावित नऊ महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे. यासह मुंबईतील केवळ एका महाविद्यालयात १०० ऐवजी ५० प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. अशा स्थितीत आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २६ झाली असून एकूण प्रवेश क्षमता ४ हजार ७८० वरून चार हजार ८३० झाली आहे.
नांदेड आणि कळव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय शिक्षणासाठी तज्ज्ञांची समिती नेमून महिनाभरात ‘व्हिजन २०३५’ तयार करण्याचे आदेश दिले. त्यांच्याच आदेशाला बगल देत वैद्यकीय शिक्षण विभागाने आजपर्यंत यासाठी सर्वसाधारण समितीही.
राज्यातील २५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे ४५ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांची एकूण मंजूर पदे ३,९२७ असून त्यापैकी १,५८० पदे रिक्त आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिचारिका आणि तंत्रज्ञांच्या ९,५५३ पदांपैकी ३,९७४ पदे रिक्त आहेत; तर दुसरीकडे प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाकडून पाठपुरावा सुरू झाल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने सांगितले. यासोबतच स्थानिक स्तरावर कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक व परिचारिकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
professors Bharti 2024: राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयात मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडलेली आहे. शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, यासाठी नेट-सेट, पीएच.डी. संघर्ष समितीच्या वतीने ५ जूनपासून उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मागील पाच वर्षांपासून संघर्ष समितीच्या वतीने राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक भरती करावी याबाबत सातत्याने आंदोलन केले आहे. अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ तसेच २०१७ च्या २,०८८ पदांची भरती आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारने राज्यामध्ये कृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील हजारो प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरावीत यासाठी पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर संघर्षसमितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी होणार आहेत. संघर्ष समितीच्या वतीने उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आंदोलनचे निवेदन सादर केले
विद्यापीठातील पदभरतीही रखडली
■ पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १११ पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.
■ ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता तसेच फेब्रुवारी मध्ये एसईबीसी आरक्षण जाहीर केल्यामुळे आरक्षणा- नुसार सुधारित जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या
यूजीसी व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त असलेली शंभर टक्के पदे भरली जावीत. जावे. तासिका तत्त्वाची शोषण करणारी धोरण थांबून समान कामाला समान वेतन दिले २०१७ ची प्राध्यापक भरती गतिमान करून ती पदे त्वरित भरली जावीत. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ कायम प्राध्यापकांची नेमणूक केली जावी.
professors Bharti 2024:There are 34 posts of Assistant Professors in the newly established Government Medical College Dharashiv and 30 posts in Sindhudurg. In this, the tribal community with seven and a half percent reservation does not have a single post. Online applications are invited for the recruitment of Assistant Professor, Medical Education and Research Service, Group-B posts in various departments of Government Medical Colleges as well as newly established Government Medical Colleges, Dharashiv, Alibag, Sindhudurg, Nandurbar, Parbhani and Satara. Such advertisement has been given through MPSC on 5th December 2023. There are 580 posts of assistant professors, including 185 posts in the newly established six government medical colleges out of a total of 765 posts. Get all details about professors Bharti 2024 at below
नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे. परभणीत २२ पदे असून, यात दोन पदे आदिवासींना आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील विविध विभागातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- ब या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी तशी जाहिरात देण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक पदांच्या ५८० जागा असून, नव्याने स्थापन झालेल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील १८५ पदे अशा एकूण ७६५ जागांचा समावेश आहे.
एनटी, एसबीसी या प्रवर्गालाही बसला फटका :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीत धाराशिव, सिंधुदुर्ग मध्ये एनटी ( सी), एनटी (डी) व एसबीसी प्रवर्गाला एकही राखीव पद मिळाले नाही. अनुसूचित जाती व जमाती यांचे सार्वजनिक सेवा योजनेचे आरक्षण हे भारतीय राज्य घटनेच्या कलम १५(४), १६ (४) ( ४ क), कलम ३३५ , कलम ३४२ व आरक्षण अधिनियम २००४ नुसार अबाधित आहे. परंतु बिंदूनामावली चुकविल्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर गदा आली आहे. त्यामुळे विहित आरक्षणानुसार प्रतिनिधित्व मिळत नाही. प्रत्येक संवर्गाला आरक्षण धोरणानुसार त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. कोणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
Maharashtra Pradhyapak Bharti 2024
Know More details about Maharashtra Pradhyapak Bharti 2024 so that you will get idea about Lastest Ongoing Recruitments in Maharashtra. Check Subject Wise Professors vacancies in Maharashtra State at below
‘या’ विषयाची पदे
- शल्यचिकित्साशास्त्र, क्ष-किरणशास्त्र,
- शरीररचनाशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र,
- चिकित्साशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बालरोग रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध
- वैद्यकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, अस्थिव्यंगोपचार शास्त्र,
- कान, नाक व घसाशास्त्र, बधिरीकरण शास्त्र, औषध वैद्यकशास्त्र,
- नेत्रशल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र.
Maharashtra Professors Bharti 2023 News
Professors Bharti 2023 : Colleges of Engineering and Pharmacy had been clamoring for vacancies for many years. Also, many interested letter holders had given a statement to the government for recruitment. After that, the government will create the post and soon the recruitment will be done. So many will get relief.
राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार !!
ग्रेड वेतन ७६०० किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असतील. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी २३ कोटी ५२ लाख खर्चास मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार आहे.
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयात अनेक वर्षांपासून रिक्त पदांची ओरड होती. तसेच अनेक इच्छुक पत्रधारकांनी सरकारला पदभरतीसाठी निवेदन दिले होते. त्यानंतर आता शासनाने पदनिर्मिती करून लवकरच पदभरती होणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Pradhyapak Bharti 2023 Update
Principal professors Bharti 2023 – Although the Directorate of Higher Education has started the process to fill the large number of vacancies in the senior colleges of the state, it has come to light that the aided colleges have ignored it. Due to this, the Directorate has given these colleges a deadline of June 15 to file proposals for filling up the vacancies. After that, if the proposals are not filed, the department informed that direct action will be taken.
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने कार्यवाही सुरू केली असली तरी अनुदानित महाविद्यालयांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची बाब समोर आली आहे.यामुळे संचालनालयाकडून या महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जर प्रस्ताव दाखल करण्यात आले नाहीत तर थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील १२२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ५२३ जागांसाठी मागील काही महिन्यांपासून ना-हरकत आणि मागणी प्रस्ताव दाखल केला नाही. या जागा भरण्यासाठी विभागाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असतानाही त्यासाठी अनेक महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले आहे.
विशेष म्हणजे या रिक्त असलेल्या या जागा अनेक महत्त्वाच्या विषयाच्या आणि राखीव गटातील आहेत. त्या भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली दिली आहे; मात्र संस्थाचालक आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडून या जागा भरण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांना विभागाकडून अखेरची संधी देण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात १ ऑक्टोबर २०१७ रोजी रिक्त पदांनुसार राज्यात २ हजार पदे भरण्यास शासनाने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात सहायक प्राध्यापकांच्या १८४ रिक्त पदांचा समावेश आहे. उच्च शिक्षण विभागाने २१ जुलैनंतर सातत्याने प्राचार्य, सहसंचालक, विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करावी व ‘ऑनलाइन’ ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संस्थाचालकांनी जुमानले नाही.
Marathwada Principal Bharti 2023
उच्च शिक्षण प्रधान सचिवांनी विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेत रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, तरीही महाविद्यालये जुमानत नसल्याने अखेर उच्च शिक्षण संचालकांनी १२ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून मंजूर पदे असलेल्या महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मुदत दिली. अन्यथा पदे इतर संस्थांना वर्ग करण्याचा इशारा दिला. तरीही संस्थाचालकांनी जुमानले नाही. अनेक संस्थांचे प्रस्ताव मावक, रोस्टर, विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाच्या फेऱ्यात अडकले असल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे. आचारसंहितेनंतर गती महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ना-हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. महाविद्यालयांनी मंजूर पदे भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे वारंवार आवाहन करत आहोत. आतापर्यंत राजूर येथील संस्थेच्या ४, भूम येथील संस्थेच्या १७ पदांची जाहिरात निघाली आहे. जालना येथील संस्थेस १७ पदांची एनओसी मिळाली आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेला गती येईल.
जिल्हानिहाय अनुदानित महाविद्यालये
- औरंगाबाद – ३९
- बीड – ४०
- जालना – १४
- उस्मानाबाद – २२
Principal Bharti 2023
Principal Bharti 2023: Administration Has Given A Deadline For The Appointment Of Principals To The Colleges. If the post of Principal is vacant, the examination applications and eligibility applications of the students of such colleges will not be accepted. For more details about Principal Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
तांत्रिक अडचणीमुळे नियमित प्राचार्य भरण्यासाठी अडचण आली आणि प्रभारी प्राचार्य असेल, तर त्याची विद्यापीठाकडून १० ऑगस्टपर्यंत मान्यता घ्यावी लागणार आहे. प्राचार्य पद रिक्त असेल, तर अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, पात्रता अर्ज स्वीकारले जाणार नाहीत; तसेच इतर पत्र व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Principal Bharti 2023
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रडावर आता प्राचार्यांची पदे न भरणारी महाविद्यालये आहेत.
- दहा ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांना प्राचार्य नियुक्तीची प्रशासनाने डेडलाइनच दिली असून, मुदतीत प्राचार्य पदावर नियुक्ती केली नाही, तर विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्जच स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
- प्राचार्यांशिवाय महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
- पायाभूत सुविध, पात्र शिक्षकांची नेमणूक नसलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणी प्रक्रियेसह आता प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे.
- कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या विशेष अधिकारातून महाविद्यालयांची तपासणी सुरू असून, यात सहा महाविद्यालयांवर अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश बंदी, यासह दंडात्मक कारवाई करण्यात आली.
- त्यानंतर आता प्राचार्य नियुक्तीवरून महाविद्यालयांवर कारवाईची तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते.
विद्यापीठाने बुधवारी प्राचार्य भरती न करणाऱ्या महाविद्यालयांना पत्राद्वारे प्राचार्य पद तात्काळ भरा, असे स्पष्ट केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४८०पेक्षा अधिक आहे. त्यापैकी अनुदानित वगळता इतर बहुतांश महाविद्यालयांकडे प्राचार्य पदे रिक्त किंवा प्रभारी नियुक्ती आहे. अनेक प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीबाबतही गोंधळ आहे. त्यामुळे प्रशासनाने महाविद्यालयांना सविस्तर पत्र पाठवून नियमांनुसार प्राचार्य पदे भरण्याचे निर्देश दिले. सोबत नियमावलीही देण्यात आली आहे. दहा ऑगस्टपर्यंत भरावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवृत्त संवर्गातील अध्यापकांमधून प्राचार्य निवडीलाही मर्यादा
- विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये निवृत्त संवर्गातील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त करण्याची पद्धत होती; परंतु, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून निवृत्त संवर्गातील अध्यापकांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी एक वर्षासाठी नियुक्ती करता येणार नाही.
- यासह अभ्यासक्रमाच्या कार्यभारानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापक, शारिरीक शिक्षण निर्देशक, ग्रंथपाल पदे पुर्णवेळ भरणे आवश्यक आहे.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र अध्यापक यांसह नॅक मूल्यांकन, पुनर्मुल्यांकन करणे अनिवार्य आहे.
- तसे न केल्यास महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
Table of Contents