Prime Minister Short Term Training Program – काळानुरूप बदलते तंत्रज्ञान लक्षात घेत उद्योग क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा आणि युवा वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना राबविली जाणार आहे. दरवर्षी ७५ हजार जणांना प्रशिक्षित करण्याची ही योजना असून लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले जाणार आहे. येत्या ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थाग आयटीआय आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांत एकूण २ हजार ५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या तुकडीचे ऑनलाईन उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे, या अभ्यासक्रमासाठी रोजगार इच्छुक तरुणांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. आयटीआय आणि तंत्रनिकेतनच्या नियमित वेळेतील अभ्यासक्रमानंतरच्या वेळेत मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम राबविला जाणार आहे. अल्पमुदत अभ्यासक्रमांमध्ये २५ टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी असतील. या अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी १ ते ५ हजार रूपये प्रति महिना इतके शुल्क असणार आहे.

कोणकोणते अभ्यासक्रम असणार ?
मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एरोस्पेस स्ट्रक्चर फिटर, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ड्रोन तंत्रज्ञान, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजंस, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल रिपेअर टेक्निशियन आदी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावर या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करता येणार आहे. उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये केवळ महिलांसाठी ३६४ बॅचेस असतील. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, एआय, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४०८ बॅचेस आहेत. वाढवण बंदरासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध करून देणारे प्रशिक्षण, ग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन व्यवसायाकरिता आठ तुकड्या, आयटीआय दादर येथे सेमीकंडक्टर टेक्निशियन व्यवसाय सुरू होणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















