राज्यात पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यात तब्बल ३३ हजार पोलिस पदे रिक्त आहेत. मात्र, भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

राज्यातील अनेक तरुण पोलिस भरतीसाठी जोरदार तयारी करत आहेत. सरकारकडून वेळोवेळी आश्वासनं दिली जात असली तरी अद्याप भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असूनही कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९,००० पोलिस पदांसाठी भरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतरही या भरतीबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढत आहे.
राज्यातील हजारो उमेदवार पोलिस भरतीच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत. मात्र, प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सरकारने लवकरात लवकर भरती जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















