पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना नॉन क्रिमीलेयरचा संभ्रम – police bharti non creamy layer certificate

police bharti non creamy layer certificate

police bharti non creamy layer certificate : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी १८ हजार ३३१ पोलीस शिपाई पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रक्रियेत कागदपत्राबाबतची नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १  एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील असावे. अन्यथा निवड रद्द केली जाईल,अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावर्षीचे कागदपत्रे कशी काढावीत. यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

Police Bharti Non CreamLayer

महाराष्ट्रामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार होती. परंतु वयवाढीच्या मुद्यामुळे ही भरती प्रक्रिया काहीशी पुढे ढकलण्यात आली, तद्नंतर उमेदवारांना २ वर्षांची वय वाढ देण्यात येऊन ही भरती प्रक्रिया ९  नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची ९ ते  ३० नोव्हेंबर पर्यंत २१ दिवस असणार आहे. पोलीस शिपाई पदासांठी प्रथम ५०  गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा, त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११०: प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे.  अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 

बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की,  दरवर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाकडून काहीतरी त्रुटी रहात असतात. यावर्षीच्या भरतीप्रक्रियेतही कागदपत्राबाबतची एक सूचना देण्यात आली आहे व त्यामध्ये नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वषार्तील असावे, अन्यथा निवड रद्द केली जाईल. अशी सूचना दिल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, की आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावषीर्चे कागदपत्रे कशी काढावीत. तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करावे,अशी मागणी रुपनवर यांनी केली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड