पोलिस दलात ३३ टक्के महिलांची भरती करावी
Police Bharti ladies reservation 33%
Police Bharti Ladies Reservation 33% – ‘राज्याच्या पोलिस दलात सुमारे दोन लाख २२ हजार पोलिस असून, त्यामध्ये केवळ २९ हजार महिला पोलिस आहेत. वास्तविक ३३ टक्के आरक्षण गृहीत धरल्यास पोलिस दलात सुमारे ७० हजारांच्यावर महिला पोलिस असणे आवश्यक आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलिस दलात ३३ टक्के महिला पोलिसांची भरती करावी,’ अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
महिलांवर होणारे अत्याचार, तसेच महिलांचे इतर प्रलंबित प्रश्न घेऊन सह्याद्री अतिथिगृह येथे महिला सुरक्षा आणि दिशा कायदा यासंबंधी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराजे देसाई यांना भेटले. आमदार कायंदे यांच्या निवेदनावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘नवीन १२ हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये महिलांची संख्या ३३ टक्के होईलच याची आम्ही काळजी घेऊ. इतर मागण्यांवरही आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
महिला पोलिसांच्या सोयीसुविधा त्यांच्या कामाच्या वेळा व त्यांच्यासाठी शौचालयांचीही कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. पोलिसांसाठी फिरती शौचालय असण्याची आवश्यकता आहे. तसेच सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. महिला पोलिसांना समुपदेशन करण्याच्या पद्धती किंवा समुपदेशन कसे करावे याबाबत विशेष ट्रेनिंग देण्याची गरज आहे, असेही कायंदे यांनी यावेळी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mi job kru ichite mi 8 vi pass aahe
Police bharti kevha honar
Police bharti sathi hight ani age kiti लागेल