अल्पसंख्याक समुदायातील युवक-युवतींसाठी निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित! – Police Bharti Free Training
Police Bharti Free Training for minority candidates
Police Bharti Free Training for minority candidates – It is necessary to create a supportive environment for youth and young women from minority communities (Muslim, Christian, Parsi, Jain, Buddhist, Sikh) to bring them into the mainstream of progress. In accordance with this, through the Minority Development Department of the Government of Maharashtra, residential police pre-recruitment training has been organized for the young men and women of the minority community.
अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, शीख ) युवक व युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात आश्वासक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायातील युवक- युवतींसाठी निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Police Training For youths from minority communities Resident Police PreRecruitment Training to Sambhajinagar nashik news) अल्पसंख्याक समुदायातील किमान १२ वी इयत्ता उत्तीर्ण युवक -युवतींना तीन महिन्यांच्या कालावधीचे पोलिस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण ‘प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेमार्फत’ देण्यात येणार आहे. तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत शारीरिक चाचणी, धावणे, गोळाफेक इत्यादींचे प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येईल. तसेच सामान्य ज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या लेखी परीक्षेतील विषयांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल.
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण केले असणे गरजेचे आहे. १८ वर्षे ते ३३ वर्षे या वयोगटातील उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ से.मी. तर महिला उमेदवारासाठी किमान उंची १५५ से.मी. असणे गरजेचे आहे. मोफत प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (L.C.), एस.एस.सी., एच.एस.सी/पदवी (गुणपत्रक/प्रमाणपत्र), ३ पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, आधार कार्ड या कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतीसह पुढील पत्त्यावर अर्ज करावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीसाठी उमेदवार ७७२२०७००५५ / ६६ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम तारीख २५ मे असून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित स्पेक्ट्रम ॲकॅडमी ,पहिला मजला, श्रीहरी साफल्य बिल्डिंग, महात्मा फुले चौक, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
apply ks kraych sir website tr dili nahi
भरती साठी अर्ज (फॉर्म) वेबसाईट कोणती आहे सर..?
Police army naukari Malawi
Apply ks karayech