राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पोलिस शिपाई भरतीमधील सर्वसाधारण प्रवर्गाची वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवून ३८ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिस मित्र अभ्यासिका, बाभूळगाव यांच्या वतीने मुख्य प्रतोद तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक युवक गेल्या अनेक वर्षापासून पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. मात्र, भरती प्रक्रियेत होणारा विलंब, न्यायालयीन प्रक्रिया तसेच इतर प्रशासकीय कारणांमुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर जात आहेत. इतर राज्यांमध्ये पोलिस भरतीसाठी अधिक वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मध्य प्रदेश व गुजरातमध्ये ३८ वर्षे, तर आसाममध्ये ४० वर्षापर्यंत उमेदवारांना संधी दिली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा वाढवून उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना परिसरातील तसेच अकोला येथील अनेक युवक उपस्थित होते.

दरम्यान मागील वर्षी राज्य सरकारने घोषणा करूनही पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील 30 ते 40 हजार विद्यार्थी हे आता होणाऱ्या भरतीत वयोमर्यादातून बाद होणार आहेत. त्यांना ही वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेद्वारे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















