पोलीस भरती – दुसरा टप्पा ८,७५७ पदे लवकर अपेक्षित

Police Bharti 2020

राज्यातील पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारच्या सुरू असेलल्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त करतानाच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, पोलिस नायक व कॉन्स्टेबलची रिक्त असलेली आठ हजार ७५७ पदे लवकरात लवकर भरण्याविषयी पावले उचलण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. या भरती संदर्भातील आणि महाराष्ट्रातील सर्व भरती बद्दल अद्यावत माहिती www.MahaBharti.in या पोर्टल वर प्रकाशित होत राहील. 

देशभरातील विविध राज्यांत पोलिसांच्या असलेल्या रिक्त पदांच्या भरतीविषयी निर्देश द्यावेत, अशा विनंतीची याचिका मनीष कुमार यांनी काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ती ११ मार्चला निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न त्या-त्या राज्यांतील उच्च न्यायालयांमध्ये पाठवून संबंधित मुख्य न्यायमूर्तींना उपायांविषयी देखरेख ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयात याप्रश्नी ‘सुओ मोटो’ जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

याविषयी नुकत्याच झालेल्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मनीष पाबळे यांनी पोलिस भरतीविषयी माहिती दिली. ‘सध्याच्या घडीला राज्यभरात मंजूर पदांपैकी केवळ पाच टक्के पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण ११ हजार ५४३ रिक्त पदांपैकी आठ हजार ७५७ पदे ही कॉन्स्टेबल, पोलिस नायक, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांची आहेत. पोलिस उपनिरीक्षकांची रिक्त असलेली एक हजार ९५५ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे’, अशी माहिती सरकारतर्फे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. त्याची दखल घेत सरकारचे प्रयत्न समाधानकारक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आणि याचिका निकाली काढली. मात्र, त्याचवेळी कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंतची आठ हजार ७५७ रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.

राज्यातील पोलिस कर्मचारी

Maharashtra Police Bharti 2020 For 8757 Posts. Total Approved vacancies are 2 Lac 19 thousand & Two Sixty Eight, Out of which 207725 are already filled. Reaming vacant post will be filled through Coming Police Bharti Recruitment Drive. The Online application forms will be available though MahaPariksha Portal.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

13 Comments
 1. Swapnil says

  Kadhi yeil ya jaga form bharne kadhi hoil chalu

 2. संजय चौरे says

  वय वर्ष ३५ पाहिजे.

 3. Akshay Aware says

  I need a job sir please update me information.

 4. Dinesh Bansilal Kumavat says

  Mala police bharti Madi joint vaycha ahe sir

 5. Rohit says

  Very important information you giving me thanks

  1. MahaBharti says

   Thanks

 6. Yogesh karve says

  Kadi honar aahe bharti

 7. bhanudas says

  online form kise bhare

  1. MahaBharti says

   अर्ज उपलब्ध झाल्यावर महाभरती वर अपडेट येईलच..

 8. […] Police Bharti New Update (१० ऑकटोबर २०१९ रोजी प्रकाशित) […]

 9. […] Team will Check the truth about this New & Given you All details & updates About SRPF Police Bharti […]

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप