आठ हजार पदांसाठी पोलिस भरती
Police Bharti 2020
गेले अनेक दिवस रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यात रिक्त असलेल्या पोलिस विभागातील जागांकरीता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना जरब बसावी म्हणून कठोर कायदा करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. अमरावती येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अनिल देशमुख यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
लोकनेते स्व.जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गृहमंत्री देशमुख म्हणाले की, पोलिस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्टनुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये.
Police bharti kadhi suru honar ahe?
पोलीस भरती कधी पासून सुरु आहे
लवकरच उपलब्ध होतील.
pashusavardhan exam date in 2019 exam told
Form kuthalya web site var bharayacha