पंतप्रधान पीक विमा योजना त्वरीत नोंदणी करा 31 जुलै 2020 पूर्वी

PM Pik Vima Yojana Apply Now

PM Pik Vima Yojana Apply Now – दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ असो की गारपीट. देशभरातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मोठी मदत करते. त्यामुळे यंदाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशी नोंद करावी लागणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारख ही 31 जुलै आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . अशा शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 अखेर नोंदणी करायची आहे.

 

काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना?

नैसर्गीक संकटामुळे ओढावलेल्या परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट किंवा तशाच प्रकारचे कोणते संकट आल्यास शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाते. नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही झाले तरी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग स्वीकारु नये त्यासाठी त्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा, असा या योजनेचा हेतू आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शेतकऱ्याला विमा निवडीचा अधिकार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे असे शेतकरी अद्यापही या योजनेशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे या योजनेसाठी नोंदणी करण्याची आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या योजनेच्या निकषांनुसार आतापर्यंत हप्त्याच्या रुपात (प्रीमियम) ठेवण्यात आलेली रक्कम 2% (खरीप पिकांसाठी) आणि 1.5% रब्बी पिकांसाठी देण्याचे प्रावधान आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकता आणि निवडीनुसार विमा घेण्येची मुभा आहे.

 

आवश्यक कागदपत्रं

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र, याशिवाय पत्त्यासाठीही या पैकीच एखादे कागदपत्र आपण वापरु शकता.

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी बँकेत जाऊन आपण अर्ज करु शकता. याशिवाय हाच अर्ज आपण ऑनलाइनही करु शकता. त्यासाठी https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावर आपण नोंदणी करु शकता. जर आपण पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी फॉर्म ऑफलाइन भरुन नोंदणी करु इच्छित असाल तर नजिकच्या राष्ट्रीयिकृत बँकेत जाऊनही आपण या विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Rajendra D Deshmukh says

    पिक विमा भरायच आहे

  2. ANANTA SHELKE says

    पिक विमा भरायच आहे

  3. Shankar Bhagwan Kad says

    मला पिके विमा भरायच आहेनवीन

  4. सारगंधर विनायक घोडे says

    मी सारगंधर विनायक घोडे माझे सन्मान योजने मधे नोदनीं केली असुन ती रिजेक्ट होत आहे माझा रिकाँर्ड केलेर असताना सुद्धा किलेर होत नाही

  5. Arvind Jethuji Mehar says

    2014 chya csmssy karjmafi योजने अंतर्गत पात्र लाभार्थी असताना सुद्धा मला कर्ज माफी योजनेतून वगळले आहे तरी कृपा करून माझे कर्ज ताबडतोब माफ करावे मोबाईल namber 7020502669

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड