प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु, त्वरित करा अर्ज! – PM Internship Scheme apply online

PM Internship Scheme 2026

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच बी.ई. व बी. टेक. सह पदवीधर शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी देशातील नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा थेट अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी लिमिटेड, तमिळनाडू मर्कन्टाईल बँक, गेल इंडिया लिमिटेड, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, प्रेसिडेंट सिस्टम लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व इतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासाठी १८ ते २५ वयोगटातील युवावर्ग या योजनेसाठी पात्र असेल.

पात्रता : उमेदवार सध्या पूर्णवेळ शिक्षण, इतर कोणतेही व्यावसायिक कौशल्य किंवा नोकरीमध्ये नसलेला (भारतीय नागरिक) असावा.
या योजनेंतर्गत निवड झालेल्या युवकांना ६ ते ९ महिन्यांचे थेट कंपनीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थी युवकांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ यांचे मोफत विमा संरक्षणही दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या योजनेतील सहभागासाठी केंद्र शासनाच्याः http://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर जाऊन ‘लॉगिन / रजिस्टर’ या टॅबवर क्लिक करून आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ज्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना या योजनेंतर्गत आपल्या आस्थापनेत उमेदवार भरती करावयाचे आहेत, अशा सर्व उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, रत्नागिरी तसेच संपर्क समन्वयकः नितिश मुरकर (जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना) ७९७२९१४८४६, पांडुरंग कानडे (८४२१२४१३३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

PM Internship Scheme 2026

If you are a young citizen between the ages of 15 and 29, MY Bharat is an excellent opportunity to progress your profession and cultivate a positive personality. You may learn about chances for occupational skill development, youth leadership, and community participation here. Participate in activities of national importance and make a significant contribution to the country’s growth.

भारत सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक संस्थांमधून इंटर्नशिपद्वारे कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी युवकांनी ‘माय भारत’ या पोर्टलवर नाव नोंदवावे. या mybharat.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल यांनी केले

या लिंक वरून करा अर्ज

 


एक आनंदाची बातमी, आजच प्रकाशित नवीन माहिती नुसार सध्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) पुन्हा एकदा अर्जांसाठी खुली झाली आहे, कारण या योजनेच्या प्रायोगिक टप्प्याच्या दुसऱ्या फेरीची सुरुवात झाली आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले. दुसऱ्या फेरीत भारतातील ७३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये असलेल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये १ लाखाहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत ६ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. हि योजना म्हणजे नवोदित उमेदवारांसाठी आपले करियर सुरु करण्याची सुवर्णसंधीच आहे.  देशभरातील ३०० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांनी – तेल, वायू आणि ऊर्जा, बँकिंग व वित्तीय सेवा, पर्यटन व आतिथ्य, ऑटोमोटिव्ह, धातू आणि खाणकाम, उत्पादन व औद्योगिक क्षेत्र, वेगाने विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तू (FMCG) आणि इतर अनेक क्षेत्रांत – भारतीय तरुणांसाठी इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे तरुणांना प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळेल, व्यावसायिकांसोबत नेटवर्किंग करता येईल आणि रोजगारक्षमतेत वाढ होईल.

PM Internship Scheme apply online

 

पात्र उमेदवार आपल्या आवडीनुसार जिल्हा, राज्य, क्षेत्र आणि विशिष्ट परिसराच्या आधारावर इंटर्नशिप शोधू शकतात आणि आपल्या सध्याच्या पत्त्यानुसार सानुकूलित अंतरात इंटर्नशिप फिल्टर करू शकतात. दुसऱ्या फेरीत प्रत्येक अर्जदार अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. पीएम इंटर्नशिप योजनेसाठी pminternship.mca.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्ज करताना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. जे पूर्णवेळ नोकरी करत नाहीत तेच उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

पीएम इंटर्नशिप योजनेत संधी मिळण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे जे पूर्णवेळ शिक्षण घेत आहेत, त्यांना देखील अर्ज करता येणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये. या शिवाय कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

ऑईल , गॅस अँड एनर्जी, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस, ट्रॅव्हल, ऑटोमोटिव्ह, मेटल अँड मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एफएमसीजी सह रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी,एल अँड टी या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येईल.

दहावी पास उमेदवारांसाठी 24696, आयटीआय झालेल्यांसाठी 23629, डिप्लोमा धारकांसाठी 18589, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 15142 आणि पदवीधरांसाठी 36901 जागांवर इंटर्नशिप करता येईल. वर्षभर इंटर्नशिप करणाऱ्यांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतनं दिलं जातं आणि एक वेळ 6000 रुपये दिले जातात. यासाठी बजेटमध्ये 840 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, दुसऱ्या फेरीसाठी संपूर्ण भारतात ७० हून अधिक IEC (माहिती, शिक्षण आणि संप्रेषण) कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत, तेथील महाविद्यालये, विद्यापीठे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रोजगार मेळावे यामध्ये हे कार्यक्रम घेतले जात आहेत.

या लिंक वरून करा अर्ज

याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर डिजिटल प्रचार मोहिमा विविध प्लॅटफॉर्मद्वारे तसेच युवा संबंधित प्रभावशाली व्यक्तींमार्फत राबवल्या जात आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना भारतातील तरुणांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही योजना २१ ते २४ वयोगटातील अशा व्यक्तींना उद्देशित आहे, जे सध्या कोणत्याही पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रमात किंवा नोकरीत नाहीत. त्यांना १२ महिन्यांच्या सशुल्क इंटर्नशिपद्वारे करिअरला सुरुवात करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड