प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु, १ लाखापेक्षा जास्त नोकरीच्या संधी, त्वरित करा अर्ज! – PM Internship Scheme apply online
PM Internship Scheme apply online @ pminternship.mca.gov.in
एक आनंदाची बातमी, आजच प्रकाशित नवीन माहिती नुसार सध्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) पुन्हा एकदा अर्जांसाठी खुली झाली आहे, कारण या योजनेच्या प्रायोगिक टप्प्याच्या दुसऱ्या फेरीची सुरुवात झाली आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले. दुसऱ्या फेरीत भारतातील ७३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये असलेल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये १ लाखाहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत ६ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. हि योजना म्हणजे नवोदित उमेदवारांसाठी आपले करियर सुरु करण्याची सुवर्णसंधीच आहे. देशभरातील ३०० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांनी – तेल, वायू आणि ऊर्जा, बँकिंग व वित्तीय सेवा, पर्यटन व आतिथ्य, ऑटोमोटिव्ह, धातू आणि खाणकाम, उत्पादन व औद्योगिक क्षेत्र, वेगाने विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तू (FMCG) आणि इतर अनेक क्षेत्रांत – भारतीय तरुणांसाठी इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे तरुणांना प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळेल, व्यावसायिकांसोबत नेटवर्किंग करता येईल आणि रोजगारक्षमतेत वाढ होईल.
पात्र उमेदवार आपल्या आवडीनुसार जिल्हा, राज्य, क्षेत्र आणि विशिष्ट परिसराच्या आधारावर इंटर्नशिप शोधू शकतात आणि आपल्या सध्याच्या पत्त्यानुसार सानुकूलित अंतरात इंटर्नशिप फिल्टर करू शकतात. दुसऱ्या फेरीत प्रत्येक अर्जदार अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. पीएम इंटर्नशिप योजनेसाठी pminternship.mca.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्ज करताना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. जे पूर्णवेळ नोकरी करत नाहीत तेच उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पीएम इंटर्नशिप योजनेत संधी मिळण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे जे पूर्णवेळ शिक्षण घेत आहेत, त्यांना देखील अर्ज करता येणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये. या शिवाय कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
ऑईल , गॅस अँड एनर्जी, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस, ट्रॅव्हल, ऑटोमोटिव्ह, मेटल अँड मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एफएमसीजी सह रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी,एल अँड टी या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येईल.
दहावी पास उमेदवारांसाठी 24696, आयटीआय झालेल्यांसाठी 23629, डिप्लोमा धारकांसाठी 18589, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 15142 आणि पदवीधरांसाठी 36901 जागांवर इंटर्नशिप करता येईल. वर्षभर इंटर्नशिप करणाऱ्यांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतनं दिलं जातं आणि एक वेळ 6000 रुपये दिले जातात. यासाठी बजेटमध्ये 840 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, दुसऱ्या फेरीसाठी संपूर्ण भारतात ७० हून अधिक IEC (माहिती, शिक्षण आणि संप्रेषण) कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत, तेथील महाविद्यालये, विद्यापीठे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रोजगार मेळावे यामध्ये हे कार्यक्रम घेतले जात आहेत.
या लिंक वरून करा अर्ज
याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर डिजिटल प्रचार मोहिमा विविध प्लॅटफॉर्मद्वारे तसेच युवा संबंधित प्रभावशाली व्यक्तींमार्फत राबवल्या जात आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना भारतातील तरुणांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही योजना २१ ते २४ वयोगटातील अशा व्यक्तींना उद्देशित आहे, जे सध्या कोणत्याही पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रमात किंवा नोकरीत नाहीत. त्यांना १२ महिन्यांच्या सशुल्क इंटर्नशिपद्वारे करिअरला सुरुवात करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.