१५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ!
पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ (PMIS) केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. ही योजना देशभरातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेसाठी१५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी १५,००० इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत.

एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचा संकल्प!
ही योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) अंतर्गत राबवली जात असून, पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेच्या माध्यमातून ६३ हजार कोटींच्या अंदाजित खर्चासह मोठ्या संख्येने तरुणांना इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातील.
आर्थिक सहाय्य आणि इंटर्नना वेतन!
प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक ६६,००० रुपये वेतन
दरमहा ५,००० रुपये आर्थिक सहाय्य
५०० रुपये कंपन्यांकडून (CSR निधी) आणि ४,५०० रुपये केंद्र सरकारकडून
नियुक्तीच्या वेळी ६,००० रुपये एकरकमी अनुदान
विमा संरक्षण आणि पात्रता निकष!
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत इंटर्नसाठी विमा कवच उपलब्ध
वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेले उमेदवार पात्र
पूर्णवेळ शिक्षण घेत नसलेले आणि बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी संधी
अर्ज करण्याची अंतिम मुदत:
ही योजना १२ मार्चला संपणार होती, मात्र ती १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पश्चिम विभागीय सहाय्यक संचालक ऋजुता बनकर यांनी दिली.
तरुणांसाठी रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल! ही संधी दवडू नका!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















