https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश

Pharmacology Students in the Next Class Without Exams

टाळेबंदीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यापूर्वीच पुढील वर्गात प्रवेश देण्याची शिफारस औषधनिर्माणशास्त्र परिषदेने केली आहे. विद्यापीठांनी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घ्याव्यात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, अशी परिषदेची भूमिका असून विद्यार्थ्यांना पुढील सत्रात दोन सत्रांची परीक्षा देण्याची मुभा परिषदेने दिली आहे.

टाळेबंदीमुळे महाविद्यालये, विद्यापीठांचे दैनंदिन कामकाज ठप्प आहे. वेळेवर परीक्षा, निकाल, पुढील प्रवेश ही प्रक्रिया पार पडली नाही तर विद्यार्थ्यांचे जवळपास एक वर्ष वाया जाणाच्या धोका आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या यंदाच्या परीक्षा घेण्यापूर्वीच त्यांना पुढील वर्षांत प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस औषधनिर्माणशास्त्र परिषदेने केली आहे. देशभरातील औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे नियमन परिषद करते. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यावर त्यांना नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाइन तासिका घेऊन सैद्धांतिक विषयांचे शिक्षण देण्यात यावे. सर्व परिस्थिती निवळल्यावर विशेष तासिकांचे आयोजन करून प्रात्यक्षिके घेण्यात यावीत, अशा सूचना परिषदेने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची तातडीने परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याची शिफारस करण्यात आली असली तरी त्याचा अर्थ परीक्षाच होणार नाहीत असा मात्र नाही. विद्यापीठे जेव्हा परीक्षांचे नियोजन करतील तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे पुढील वर्षी किंवा पुढील सत्रात दोन्ही सत्रांतील किंवा वर्षांतील विषयांची परीक्षा एकदम देण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा मात्र विद्यापीठांनी प्राधान्याने आणि वेळेवर घ्याव्यात, अशीही सूचना देण्यात आली आहे.

अंतिम अधिकार विद्यापीठांनाच

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

औषधनिर्माणशास्त्र परिषद ही अभ्यासक्रमाचे नियमन करणारी यंत्रणा असली तरी परीक्षा घेण्याचे अधिकार हे विद्यापीठांना किंवा शिक्षणसंस्थांचे आहेत. त्यामुळे परिषदेने शिफारशी केल्या असल्या तरी याबाबत अंतिम निर्णय हा विद्यापीठांचाच असणार आहे. सध्या राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन कसे करण्यात यावे याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा कशा घ्याव्यात?

  • * पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.फार्म.) विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.फार्म) पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांतील किंवा दोन वर्षांच्या विषयांची परीक्षा पुढील वर्षी देण्याची मुभा मिळेल
  • * अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि त्यापूर्वीच्या सर्व वर्षांतील विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय पदवी मिळणार नाही.
  • * उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल नाहीत.
  • * पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रकल्प किंवा शोधनिबंध आणि तोंडी परीक्षेच्या आधारे केले जाते. तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात यावी.
  • * पदव्युत्तर पदवी मिळण्यासाठी आधीच्या सर्व सत्रांतील सर्व विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • * या शिफारशी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीपुरत्या म्हणजेच एका वर्षांपुरत्या लागू राहणार आहेत.

सोर्स : लोकसत्ता


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड