अंतिम वर्ष पदवीच्या परीक्षेवेळी पुस्तक घेऊन बसण्यास परवानगी

Permission to Carry A Book During The Exam

Permission to Carry A Book During The Exam : दिल्ली विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन बसण्यास (ओबीई) दिल्ली उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनांसह परवानगी दिली आहे. या परीक्षा येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणारआहेत.

दिल्ली विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन बसण्यास (ओबीई) दिल्ली उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनांसह परवानगी दिली आहे. या परीक्षा येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणारआहेत.

Permission to Carry A Book During The Exam

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत, विद्यार्थ्यांना ईमेल आणि विद्यापीठाच्या पोर्टलवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाव्यात. तसेच उत्तर पत्रिका अपलोड करण्यास त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात यावा, असे निर्देश न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी दिले.

तसेच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ‘ऑटो जनरेटेड’ ईमेल पाठवण्याचे निर्देश देतानाच, विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर, याची माहिती देणारा मेलही विद्यार्थ्यांना गेला पाहिजे, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नोडल अधिकारी आणि सेंट्रल इमेल आयडीच्या संदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली विद्यापीठाने ठरवलेल्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये पुस्तक घेऊन बसण्याच्या निर्णयाला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. यावेळी न्या. सिंह यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छाही दिल्या. येत्या १० ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाइन ओपन बुक परीक्षा (ओबीई) होणार असून, जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार नाहीत, त्यांना वर्गामध्ये बसून परीक्षा देण्याचीही संधी मिळणार आहे. या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील.

न्यायालयाचे निर्देश

  • या परीक्षांचे निकाल हे तातडीने लावण्यात यावे आणि उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पाठवण्यात यावी.
  • प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आणि उत्तरपत्रिका अपलोड करण्यात येणाऱ्या समस्यांसह विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
  • तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्या तक्रार समितीकडे पाठवण्यात याव्यात.
  • निवृत्त न्या. प्रतिभा रानी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार समिती स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या तक्रारी पाच दिवसांच्या आत सोडवाव्यात.
  • परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठ आणि समितीने आपापला अहवाल सादर करावा.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड