JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राज्य कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बद्दल नवीन खुशखबर! | Pension Bonanza for State Employees!

मित्रांनो एक महत्त्वाचा अपडेट! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पेन्शन योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत (NPS) सामील असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजी ‘यूपीएस’ अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती!!

 Pension Bonanza for State Employees!

UPS योजनेस मान्यता
निवृत्तिवेतन नियामक मंडळ (PFRDA) ने एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) मंजूर केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निश्चित निवृत्तिवेतन मिळणार आहे.

1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी
या नव्या नियमावलीनुसार, 1 एप्रिल 2025 पासून UPS योजनेत नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात सादर करता येतील. मात्र, सेवेतून काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध राहणार नाही.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

50% निश्चित निवृत्तिवेतन आणि सेवा अटी
नव्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला अंतिम 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळणार आहे. मात्र, किमान 25 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक असेल.

23 लाख कर्मचाऱ्यांसाठी पर्याय खुला
या निर्णयामुळे 1 जानेवारी 2004 पासून लागू असलेल्या NPS किंवा नवीन UPS पैकी एक पर्याय निवडण्याची संधी 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. पूर्वीच्या जुना पेन्शन योजनेप्रमाणे (OPS) कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षाच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्तिवेतन म्हणून मिळत असे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड