प्रतीक्षा संपली, पुणे जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया अखेर सुरु, हॉलतिकीट डाउनलोड लिंक – PDCC Hall Ticket
PDCC Hall Ticket
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चार वर्षांपासून रखडलेल्या ३५६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. बँकेने ऑगस्ट २०२१ मध्ये या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते आणि ३२,००० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. दरम्यान, सहकार विभागाने बँकेला शासनाने नियुक्त केलेल्या पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या होत्या, एका विशिष्ट संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबविण्याचा संचालक मंडळांचा हट्ट होता. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेला 4 वर्ष लागले आहेत. भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर रखडली होती तिथूनच सुरू राहील.
सहकार विभागाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर, बँकेने आता प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले होते ते या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र आहेत आणि नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अपडेटसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे. या भरती मोहिमेद्वारे क्लर्कची पदे भरण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. पुढील टप्प्यांपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रक्रीयेसंबंधीचे निवेदन बँकेने संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दि.०७/०८/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून दि.०७/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यापैकी पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, सदर प्रलंबित लेखनिक पदाची भरती प्रक्रिया ज्या टप्यावर प्रलंबित झालेली होती त्या टप्यावर पुढे सुरू करण्यात येत आहे. सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाच्या सुचना, ऑनलाईन परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रक्रियाबाबतच्या या लिंक वर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करतांना नमूद केलेल्या ई-मेल आय. डी. वर सदर भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक उद्या सोमवार, दि. १९/०५/२०२५ रोजी पाठविण्यात येणार आहे. बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करून ध्यावी, बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.