पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत ५७५ पदांवर प्रशिक्षणाची संधी- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नोकरीच्या संधी! – PCMC CMYKPY Bharti 2024

PCMC CMYKPY Bharti 2024

PCMC CMYKPY Bharti 2024 – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत ५७५ पदांवर युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार असून या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. तसेच महानगरपालिकेच्यावतीने अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सुविधा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र, मोबाईलद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणीकृत १२ वी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीधारण करणाऱ्या सुमारे ५७५ युवकांना महापालिकेच्या विविध विभागात कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC Bharti 2024 Details

 

या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. तो १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बॅंक खाते असावे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना ८ हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना १० हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

आपले शिक्षण पूर्ण करुन युवक नोकरी, व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देऊन त्यांच्यात रोजगाराबाबत सर्व क्षमता निर्माण करण्यासाठी महापालिका ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या एकूण पदांच्या ५ टक्के पदे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. त्यानुसार विविध विभागांच्या मागणीनुसार एकूण ५७५ जागा भरण्यात येणार आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड